Breaking News

मोबाईल खरेदीसाठी ‘ती’ रक्त द्यायला तयार : अल्पवयीन मुलगी पोचली थेट ब्लड बँकेत

Advertisements

 

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबतच आता मोबाईल फोनही गरजेची वस्तू बनला आहे. अनेक दैनंदिन कामे मोबाईलच्या माध्यमातून करीत असतो. हातात महागडा स्मार्टफोन आजकाल स्टेट्स आहे. अगदी शाळकरी मुलेही मोबाईलमध्ये गुंतलेली असतात. मोबाईल मिळवण्यासाठी मुले कोणत्याही थराला जाऊ शकतात. असाच एक धक्कादायक प्रकार पश्चिम बंगालमध्ये समोर आला आहे.

Advertisements

मुलगी पोहोचली ब्लड बँकेत

पश्चिम बंगालमधल्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. एक अल्पवयीन मुलगी बालुघाट इथल्या ब्लड बँकेत पोहोचली. तिथे गेल्यावर तीने आपल्याला रक्त द्यायचं असल्याचं सांगितलं. रक्त घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना संशय आला, त्यांनी त्या मुलीकडे रक्त देण्याचं कारण विचारलं. त्यावर तीने दिलेल्या उत्तराने ब्लड बँकेतले कर्मचारी हैराण झाले.

का द्यायचे होते रक्त?

या मुलीला स्मार्टफोन विकत घ्यायचा होता, पण तिच्याकडे पैसे नव्हते. त्यासाठी तिने स्वत:चं रक्त द्यायचा निर्णय घेतला. तीने मोबाईल ऑनलाईन ऑर्डर केला होता, पण तो घेण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. रक्त दिल्यावर पैसे मिळतात असं कोणीतरी तिला सांगितलं होतं. त्यामुळे आपल्या घरापासून तीस किलोमीटर दूर असलेल्या ब्लड बँकेत ती पोहोचली. ट्यूशला जात असल्याचं तीन घरात सांगितलं. त्यानंतर तीने आपली सायकल बस स्टॅँडवर लावली आणि तिथून बस पकडून ती दुसऱ्या जिल्ह्यातील बालुरघाट इथं पोहोचली.

प्राप्त माहितीनुसार त्या अल्पवयीन मुलीचे वडिल भाजी विक्रेते आहेत आणि गृहिणी आहे. या घटनेची माहिती ब्लड बँकेतील कर्मचाऱ्यांनी मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला दिली. त्यानंतर या मुलीचं समुपदेशन करण्यात आलं आणि तिला आपल्या आई-वडिलांकडे पाठवण्यात आले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

धर्मेंद्र-हेमा मालिनींच्या लेकीचा ११ वर्षांचा संसार मोडला : ईशा देओल/भरत तख्तानी झाले विभक्त

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र व अभिनेत्री हेमा मालिनी यांची लेक ईशा देओलबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली …

सतत चुकीच्या पद्धतीने केला स्पर्श : अभिनेत्री भूमी पेडणेकर

‘भीड’, ‘थॅंक यु फॉर कमिंग’, ‘द लेडी किलर’सारख्या हटके चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री भूमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *