Breaking News

प्रियांका चोप्राचा किस देण्यास नकार : अभिनेता संतापला

अभिनेते अन्नू कपूर बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नुकतीच त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला एका मुलाखत दिली. या मुलाखतीचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये अन्नू कपूर यांनी देशभक्ती, त्यांची अमेरिकन पत्नी आणि प्रियांका चोप्राशी निगडित वादावर रोखठोक भाष्य केले आहे. देशभक्ती हे काही अत्तर नाही, असे सांगताना ते म्हणाले की, कोणत्या कार्यक्रमात जायचे असेल तेव्हा देशभक्ती अत्तरप्रमाणे शरीराला लावता येत नाही. लग्नात जायचंय तर चांगली देशभक्ती लावावी, असे नाही. तसेच देशभक्ती ही आपल्या धमन्यांमधून २४ तास वाहायला हवी. याशिवाय त्यांनी प्रियांका चोप्राबरोबर झालेल्या वादावरही प्रतिक्रिया दिली. प्रियांका चोप्राने अन्नू कपूर यांच्यासह इंटिमेट सीन देण्यास नकार दिला होता, त्यावर अन्नू कपूर यांनी नाराजी व्यक्त केली.

 

अन्नू कपूर यांना जेव्हा प्रियांका चोप्राशी झालेल्या वादाबाबत छेडले, तेव्हा ते म्हणाले, “तेव्हा (सात खून माफ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान) एक बातमी आली होती. प्रियांका चोप्राने माझ्याशी किस करण्यास असमर्थतता दर्शविली होती. जर मी हिरो असतो तर प्रियंका चोप्राला किस करण्यात कोणतीही अडचण आली नसती. इंडस्ट्रीत हिरोला चुंबन देण्यास कोणत्याच हिरोईनला अडचण नसते. पण दुसऱ्याबाजूला मी आहे, ज्याच्याकडे ना रुप आहे, ना व्यक्तिमत्व. म्हणून मला किस देण्यास नकार दिला असावा.”

 

अन्नू कपूर यांनी पत्नी अनुपमा पटेलबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, “माझी पत्नी अमेरिकन नागरिक आहे. पण तरीही मी ग्रीन कार्ड किंवा अमेरिकन नागरिकत्व मिळविण्यासाठी कधीही अर्ज केला नाही. मी आयुष्यभरात कधीही, मेलो तरीही तिथला पासपोर्ट बनविणार नाही. माझी अडचण हीच आहे की, मी निष्ठावान प्रकारतला माणूस आहे.”

 

२०११ साली प्रियांका चोप्रा अन्नू कपूरबाबत काय म्हणाली?

२०११ साली सात खून माफ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रियांका चोप्राच्या सात पतींची कहाणी दाखविण्यात आली होती. ज्यामध्ये ती एकामागोमाग प्रत्येक पतीचा खून करते. त्यापैकीच एक अन्नू कपूरही दाखिवण्यात आले होते. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अन्नू कपूर यांनी सांगितले होते की, मी सुंदर दिसत नाही म्हणून प्रियांका चोप्राने माझ्याशी इंटिमेट सीन देण्यास नकार दिला होता. जर मी सुंदर दिसणारा असतो तर प्रियांका चोप्राने नकार दिला नसता.

About विश्व भारत

Check Also

मशहूर भजन गायक रघवुंशी ने कोमल सकलानी संग त्रियुगीनारायण मंदिर में लिए फेरे

मशहूर भजन गायक रघवुंशी ने कोमल सकलानी संग त्रियुगीनारायण मंदिर में लिए फेरे टेकचंद्र सनोडिया …

आलिया भट्ट की फेवरेट सेक्‍स पोजीशन क्या है?सेक्स लाइफ को लेकर खुलासे

: बॉलीवुड के सेलेब्‍स अपनी सेक्‍स लाइफ या निजी जिंदगी के बारे में कम बात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *