Breaking News

दिवाळीपूर्वीच सोने- चांदीच्या दरात घट… आजचे दर?

नवरात्रीनंतर सातत्याने सोने- चांदीच्या दरात वाढ होत आहे. दिवाळी काही दिवसांवर आली असतांनाही दरवाढीचा क्रम कायम असल्याने ग्राहकांमध्ये चिंता होती. परंतु शुक्रवारी (२५ ऑक्टोंबर) नागपुरात सोने- चांदीच्या दरात घट नोंदवली गेली. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोने- चांदीच्या दराबाबत सध्या स्थितीत आपण जाणून घेऊ या.

 

हल्ली सोन्याच्या दर उंचीवर गेल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. दिवाळीपूर्वी नागपुरातील सराफा बाजारात २४ ऑक्टोंबरला बाजार बंद होतांना रात्री सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७८ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार २०० रुपये नोंदवले गेले होते. शुक्रवारी (२५ ऑक्टोंबर) बाजार उघडल्यावर सोन्याचे दर गुरूवारी रात्रीच्या तुलनेत किंचित कमी झाले आहे.

 

दरम्यान नागपुरात २५ ऑक्टोंबरला नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७८ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७२ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार रुपये नोंदवले गेले. त्यामुळे दिवालीच्या काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान दिवाळीत ग्राहक मोठ्या संख्येने सोने- चांदीचे दागिने खरेदी करतात. तर लग्न समारंभ, बारसे आणि इतरही अनेक कार्यक्रमात ग्राहक भेट म्हणून सोने- चांदीचेही दागिने देतात. त्यामुळे या काळात सोने- चांदीच्या दराकडे ग्राहकांचे विशेष लक्ष राहते. दरम्यान आता दर जास्त असले तरी पुढे ते आणखी वाढण्याचा अंदाज सराफा व्यवसायिक वर्तवत आहे. त्यामुळे आताही सोने- चांदीत गुंतवणूक फायद्याची असल्याचा सराफा व्यवसायिकांचा अंदाज आहे.

 

चांदीच्या दरातही मोठी…!

 

दिवाळीच्या तोंडावर नागपुरातील सराफा बाजारात २४ ऑक्टोबरला (सोमवारी) रात्री बाजार बंद होतांना चांदीचे दर प्रति किलो ९८ हजार ९०० रुपये नोंदवण्यात आले होते. परंतु हे दर दुसऱ्या दिवशी सराफा बाजार उघडल्यावर सकाळी ११ वाजता ९७ हजार १०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपूरात चांदीच्या दरात प्रत्येक किलोमागे तब्बल १ हजार ८०० रुपये घट झाली आहे. दरम्यान दिवाळीत धनत्रयोदशीसह इतर दिवशी ग्राहक मोठ्या संख्येने चांदीची नाणी खरेदी करतात. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत ग्राहकांचा जोर कोणत्या खरेदीवर राहिल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

About विश्व भारत

Check Also

शेअर बाजार कोसळण्यासाठी PM मोदी जबाबदार?गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटींचे नुकसान

शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये १००० अंकाची घसरण होऊन सेन्सेक्स …

कारोबारी को शासन का नोटिस? बिना लाइसेंस के संचालित कर रहा था उद्योग

कारोबारी को शासन का नोटिस? बिना लाइसेंस के संचालित कर रहा था उद्योग टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *