मविआच्या 5 गॅरंटी मतदारांना भावणार का? विश्लेषकांचे याबाबतचे नेमके मत काय?
टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट
मुंबई। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर पाच आश्वासनं जाहीर करताना मविआ नेते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर आहे। महाविकासआघाडीने पाच आश्वासनं दिली आहेत. कर्नाटक आणि तेलंगणात अशाच आश्वासनांचा काँग्रेसला उपयोग झालेला दिसला आणि त्यांना दोन्ही राज्यात विजय झाला. आता महाराष्ट्रातही अशाच आश्वासनांची घोषणा करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर मविआने महाराष्ट्रात नेमकी कोणती पाच आश्वासनं दिली? या आश्वासनांचा परिणाम होईल का? या आश्वासनांचा कुणावर परिणाम होणार? आणि किती परिणाम होणार? हे राजकीय विश्लेषकांकडून जाणून घेऊयात.
मविआने कोणती पाच आश्वासनं दिली?
मविआने महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीची ‘लोकसेवेची पंचसुत्री’ अशी टॅग लाईन घेत पाच आश्वासनं दिली आहेत.
1. महालक्ष्मी योजना – महिलांना दर महिन्याला 3 हजार रुपये आणि महिला व मुलींसाठी मोफत बस सेवा देण्यात येणार.
2. समानतेची हमी – जातनिहाय जनगणना करणार आणि आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार.
3. कुटुंब रक्षण – 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषधे देणार.
4. कृषी समृद्धी – शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देणार.
महाविकासआघाडीने महिला, तरूण, शेतकऱ्यांसह आरक्षणाची आणि आरोग्य सेवेची मागणी करणाऱ्या समाज घटकांना डोळ्यासमोर ठेऊन आश्वासनं दिली आहेत. अशाप्रकारच्या आश्वासनांना काँग्रेसला आधी कर्नाटक आणि तेलंगणात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळालेला दिसला.
आता महाराष्ट्रात मविआच्या या आश्वासनांचा किती परिणाम होईल हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने काही राजकीय विश्लेषकांची मतं जाणून व्हॉट्सअॅप चॅनेलला भेट द्या
मविआच्या महालक्ष्मी योजनेचा किती परिणाम होईल?
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढाव
महायुती सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीवर प्रभाव पडू शकतो, असं बोललं जात आहे. महायुतीच्या जाहिरतींमध्ये याच योजनेला मुख्य स्थान मिळालं आहे. यानंतर आता महाविकास आघाडीनेही महालक्ष्मी योजना जाहीर केली आहे.
या योजनेंतर्गत मविआचं सरकार आल्यास राज्यातील महिलांना प्रति महिना 3 हजार रुपये देण्यात येणार आहेत. शिवाय राज्यभरात एसटी बससेवेचा मोफत प्रवास करता येईल, असंही आश्वासन मविआने दिलं आहे.
या आश्वासनाचा निवडणुकीच्या निकालावर किती परिणाम होईल याबाबत आम्ही राजकीय विश्लेषक आणि दैनिक पुढारीचे राजकीय संपादक प्रमोद चुंचुवार यांचं मत जाणून घेतलं.
प्रमोद चुंचुवार म्हणाले, “मविआने महिलांना दरमहा 3 हजार रुपये आणि मोफत बस प्रवासाच्या आश्वासनाचा मोठा परिणाम होईल. कारण विद्यमान महायुती सरकारची सध्या भिस्त लाडकी बहीण योजनेवरच आहे. या योजनेसाठी महाराष्ट्रात 2 कोटी 40 लाख महिलांनी नोंद केली आहे, त्यांना लाभ मिळाला आहे. 2 कोटी 40 लाख लाभार्थी 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या असून त्या मतदार आहेत. त्यामुळे महिन्याला 3 हजार रुपयांचं आश्वासन हे या जवळपास अडीच कोटी महिलांना प्रभावित करणारं आहे.”
“आज 1500 रुपयांसाठी ज्या महिला महायुतीला मतदान करणार होत्या, त्या महिलांना आता महाविकासआघाडी आली, तर दुप्पट पैसे मिळणार आहे, हे आकर्षित करणारं आश्वासन आहे. अशाप्रकारे लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला जी मतं मिळणार होती त्यात विभाजन करण्यात मविआची ही घोषणा परिणामकारक ठरेल. या घोषणेने मविआ त्यातील काही मतं नक्कीच स्वतःकडे वळवू शकेन,” असं मत प्रमोद चुंचुवार यांनी व्यक्त केलं