नागपूर-रत्नागिरी महामार्गावर कोल्हापूरच्या वारकऱ्यांच्या दिंडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ पंढरपूरला जाणा-या या दिंडीमध्ये भरधाव वेगाने कार घुसल्याने सात वारकरी जागीच ठार झाले. अपघातात ठार झालेले वारकरी हे जठारवाडी (जि. कोल्हापूर) या गावातील असल्याचे कळते.पोलीस दाखल झाले असून सर्वं मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी हलविण्यात आले आहेत.
कोल्हापूर जठारवाडी येथील दिंडी पंढरपूरकडे जात होती. दरम्यान जुणोनी येथे (MH 13 DE 7938) या क्रमांकाची चारचाकी ही दिंडीत घुसल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये ७ वारकऱ्यांचा यांचा मृत्यू झाला आहे. ६ जणांना उपचारासाठी पंढरपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.