विश्व भारत ऑनलाईन :
प्राथमिक शाळेच्या मान्यतेसाठी 50 हजारांची लाचेची मागणी करून 25 हजार रुपये कार्यालयातच स्वीकारणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना ताब्यात घेण्यात आले. लोहार यांच्यासह लिपिकाला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलीय. ही कारवाई सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली. यामुळे खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराची उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे स्वयंअर्थसहाय प्राथमिक शाळा आहे. पाचवी ते आठवीचे वर्ग वाढविण्यासाठी शाळेने वर्गवाढीच्या परवानगीची मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहारा यांच्याकडे केली होती. त्याचा आयडी देण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची शहानिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातच सापळा लावला होता.