गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या केबल ब्रिज दुर्घटनेत भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप खासदार मोहन भाई कुंदरिया यांचे नातेवाईकही पूल कोसळला तेव्हा तिथे होते.
खासदार मोहन भाई कुंदरिया म्हणाले, ‘या घटनेत माझ्या भाऊजींच्या भावाच्या ४ मुली, ३ जावई आणि ५ मुलं यांचा मृत्यू झालाय. हे खूप वेदनादायी आहे.’
मोहनभाई कुंदरिया हे राजकोटचे खासदार आहे. ‘मी सायंकाळपासून येथे आहे. १०० पेक्षा जास्त लोकांचे मृतदेह मिळाले आहेत.’ पूल खुला करण्याची परवानगी न घेतल्याच्या मुद्द्यावर खासदार कुंदरिया म्हणाले, ‘ज्याची चूक असेल, त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. कुणालाही सोडणार नाही.’