शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गुरुवारी मंत्रालयात प्रवेश करताना संतोष बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. मंत्रालयाच्या गार्डन गेटमधून कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यावरुन वादाला सुरुवात झाली.
कार्यकर्त्यांची नोंद न घेता थेट प्रवेश द्यावा, या मागणीसाठी बांगर आग्रही होते. तेव्हा पोलिसांनी कार्यकर्त्यांना नियमाप्रमाणे जाऊ न दिल्यानं बांगर संतापले आणि त्यांनी शिवीगाळ करीत हुज्जत घातली. हा वाद सोडवण्यासाठी अखेर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मध्यस्थी करावी लागली. याआधीसुद्धा बांगर सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणं, शिवीगाळ करणे यावरुन वादात अडकलेत.
बांगर यांचे स्पष्टीकरण…
संतोष बांगर यांनी आपल्यावरील हे आरोप फेटाळून लावलेले आहेत. सीसीटीव्ही चेक करुन सत्य शोधू शकता, अशी भूमिका संतोष बांगर बोलून दाखवली.
विश्वभारत News Website