Breaking News

सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकाऱ्याला पुण्यातून अटक

Advertisements

सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी (वय -65, रा. शारदानगर, नांदेड) यांना नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी पुण्यातील कोथरूड-कर्वेनगर परिसरातून अटक केली. गगराणी यांच्याविरूध्द नांदेड जिल्ह्यातील वजीराबाद पोलिस ठाण्यात अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हयात गगराणी यांना अटक करण्यात आली आहे. गगराणी यांना पुण्याच्या कर्वेनगर परिसरातून पथकाने नांदेड अ‍ॅन्टी करप्शनच्या टीमने ताब्यात घेतले.

Advertisements

गगराणी यांनी त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा 28 लाख 72 हजार 660 रुपयांची (45 टक्के) अधिक संपत्ती बाळगल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गगराणी हे पुण्यातील कर्वेनगर परिसरात त्यांच्या जावयाकडे वास्तव्यास असल्याची माहिती नांदेडच्या अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकास मिळाली. त्यानंतर नांदेड एसीबीच्या पथकाने पुण्यातील कर्वेनगर परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत. गगराणी यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Advertisements

अपसंपदा बाळगल्याप्रकरणी आर.एल. गगराणी यांच्यासह पत्नी जयश्री रामनारायण गगराणी (वय 57) मुलगा प्रथमेश रामनारायण गगराणी (वय 34 सर्व रा. शारदानगर नांदेड) यांच्यावर वजीराबाद पोलिस ठाण्यात कलम 13(1)(ई) सह 13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम (Prevention of Corruption Act) 1988 आणि कलम 109 आयपसी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत नांदेड एसीबीचे पोलीस उपाधीक्षक राजेंद्र पाटील (DySP Rajendra Patil) यांनी तक्रार दिली आहे. हा गुन्हा 1 मार्च 2010 ते 30 जून 2016 या कालावधीत घडला आहे.

राज्यातील प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडेंची फसवणूक

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची एका ठकबाजाने आर्थिक फसवणूक केली. आरोपीने दिलेल्या खोट्या माहितीवर विश्वास …

नागपुरात वकील महिलेने मागितली लाखांची खंडणी

कार्यालयात देहव्यापाराचा अड्डा सुरू केल्याप्रकरणी ‘लॉकअप’मध्ये बंद असलेल्या आरोपीच्या पत्नीकडून तोतया महिला वकिलाने वरिष्ठ पोलीस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *