शिंदेचा ठाकरेंना मोठा धक्का ! विदर्भात युवा सेनेला खिंडार

शिंदे गटाने आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेला मोठं खिंडार पाडलंय. पूर्व विर्दभातील युवा सेनेच्या सात जिल्हाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला. ४० बंडखोर आमदारांविरोधात महाराष्ट्रभर फिरत असलेल्या आदित्य ठाकरेंना हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड केलं. भाजपसोबत घरोबा करीत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीही झाले. त्यानंतर शिंदेंनी थेट शिवसेनेवरचा ताबा घेण्याचा प्रयत्न केलाय. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आता शिंदे गटाने विदर्भात ठाकरेंना आणखी झटका दिलाय.

शिवसेनेचे ४० आमदार आणि अनेक जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी आपल्या बाजूने वळवल्यानंतर शिंदेंच्या सेनेनं उद्धव ठाकरेंना विदर्भातच आदित्य ठाकरेंना जबर धक्का दिलाय. बाळासाहेबांची शिवसेना गटाचे विदर्भाचे प्रमुख किरण पांडव यांनी याबद्दलची माहिती दिली.

यांनी केला शिंदे गटात प्रवेश?

हर्षल शिंदे (युवासेना जिल्हाप्रमुख, चंद्रपूर), शुभम नवले (युवासेना जिल्हाप्रमुख, नागपूर ग्रामीण), रोशन कळंबे (युवासेना जिल्हाप्रमुख, भंडारा), दीपक भारसाखरे (युवासेना जिल्हाप्रमुख, गडचिरोली), कगेश राव (युवासेना जिल्हाप्रमुख, गोंदिया), नेहा भोकरे (युवती सेना जिल्हाप्रमुख, नागपूर), सोनाली वैद्य (युवती सेना जिल्हाप्रमुख, नागपूर ग्रामीण) प्रफुल सरवान (जिल्हा समन्वयक आणि नगरसेवक भद्रावती, चंद्रपूर) राज तांडेकर (जिल्हा समन्वयक, नागपूर), लखन यादव (जिल्हा समन्वयक, रामटेक), कानाजी जोगराणा (जिल्हा चिटणीस, नागपूर), अभिषेक गिरी (उप-जिल्हा प्रमुख, नागपूर ग्रामीण), सुनील यादव (रामटेक विधानसभा समन्वयक)

 

About विश्व भारत

Check Also

दो कौंडी की होती जा रही है भाजपा नेताओं की अहमियत

दो कौंडी की होती जा रही है भाजपा नेताओं की अहमियत टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

उद्धव ठाकरे और जयंत पाटिल को झटका!2 नेता BJP में शामिल

उद्धव ठाकरे और जयंत पाटिल को झटका!2 नेता BJP में शामिल टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *