Breaking News

अमरावतीत अब्दुल सत्तारांचा निषेध : राष्ट्रवादीचे ‘जोडा मारो’आंदोलन

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली.त्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पंचवटी चौकात सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. सत्तारांच्या प्रतिमेला जोडा मारो आंदोलनामार्फत रोष व्यक्त करण्यात आला. सत्तार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

सत्तार यांनी औरंगाबादमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले. सत्तारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोडा मारो आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोपर्यंत अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेणार नाहीत, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. सत्तारांवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत आपण येथून हलणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. याबाबत पोलीस आयुक्तांना निवेदनही देण्यात आले.

About विश्व भारत

Check Also

MVA की बैठक में विधानसभा सीटों पर हुई चर्चा : उद्धव ठाकरे की डिमांड

मुंबई में MVA की बैठक में विधानसभा सीटों पर हुई चर्चा, उद्धव ठाकरे की डिमांड? …

पूर्व सीएम ठाकरे ने CM शिंदे की फोटो पर जूते मारा! संजय निरुपम भडके

पूर्व सीएम ठाकरे ने CM शिंदे की फोटो पर जूते मारा! संजय निरुपम भडके ? …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *