Breaking News

अडचणीत वाढ : सत्तार यांचे फरदापूर व्यतिरिक्त अन्य दौरे रद्द, शिंदे गटाच्या प्रतिमेला धक्का!

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात आक्रमक झाली आहे. विविध शहरात सत्तार यांचा राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आलाय.

दौरे रद्द

तर, या प्रकरणानंतर सत्तार बॅकफूटवर आले आहेत. आजचे सर्व दौरे सत्तार यांनी रद्द केले आहेत. फक्त सोयगाव तालुक्यातील औरंगाबाद-जळगाव मार्गांवरील फरदापूर येथील कार्यक्रमाला सत्तार उपस्थित राहणार असल्याचे कळते.

अडचणीत वाढ

राष्ट्रवादीकडून सत्तारांविरोधात राज्यभरात निदर्शन करण्यात येत आहेत. मुंबईत त्यांच्या घराबाहेर राष्ट्रवादीने आंदोलन केलं. यावेळी त्यांच्या बंगल्याचीही तोडफोड करण्यात आली. सत्तार यांच्या राजीनाम्याचीही मागणी होतं आहे. यातून सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिंदे गट आणि सत्तार यांच्या प्रतिमेला धक्का बसलाय.

About विश्व भारत

Check Also

…DCM देवेंद्र फडणवीस को कमजोर करने की शरारत

मराठा छत्रप पवार के इशारों पर वि•स• चुनाव पूर्व भाजपा कर्मठ फडणवीस को कमजोर करने …

विधानसभा चुनाव से पहले सर्वे ने सियासत को हिलाया? उद्धव ठाकरे को लेकर बड़ा खुलासा

विधानसभा चुनाव से पहले सर्वे ने सियासत को हिलाया? उद्धव ठाकरे को लेकर बड़ा खुलासा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *