शिकारीसाठी शेतामध्ये लावलेल्या वीज प्रवाहित लोखंडी तारांना स्पर्श झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात ही घटना घडली. देवरी शहरालगतच्या मोठा परसटोला परिसरात या घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आशिष कोसरे (२६), अनमोल गायकवाड (२२, दोघेही रा. परसटोला (देवरी)असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
