Breaking News

सुप्रिया सुळे प्रकरण : राज्य पेटतोय, अजित पवारांचे मौन

Advertisements

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंना अपशब्द वापरण्यावरुन राष्ट्रवादी राज्यभर आक्रमक झाली आहे. पण दुसरीकडे याच विषयावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र मौन बाळगल्याचे दिसतेय. अजित पवारांनी याविषयात साधं ट्विटही केलेलं नाही. त्यांच्या ट्विटर आणि फेसबूक पेजवर विविध विषयांवर भाष्य करण्यात आलंय. पण सुप्रिया सुळेंवर मात्र कोणतंही विधान नाही. त्यामुळेच अजित पवारांच्या या मौनावर राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरु आहे. अजित पवार आजोळच्या कौटुंबिक कार्यक्रमाला गेलेत. अजित पवारांनी प्रतिक्रिया द्यावी ही अपेक्षा व्यक्त करु नका अशी सारवासारव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केलीय.

Advertisements

हकालपट्टीची मागणी

Advertisements

सुप्रिया सुळेंना अपशब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केलीय. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचं एका शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. तेव्हा राज्यपालांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. दरम्यान जयंत पाटील यांनी सत्तारांची भूमिका मान्य आहे का असा सवाल देवेंद्र फडणवीसांना विचारलाय. सरकार टिकवण्यासाठी कोणाकोणाचा भार उचलणार असा टोलाही लगावलाय.

राष्ट्रवादीकडून आंदोलन

कृषिमंत्री अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादीकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येतंय. अमरावती,कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात सत्तारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला. सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली. तर जालन्यात महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलकांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचे फोटो जाळले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नवनीत राणाविरोधात लढणार बच्चू कडू? शिंदे-फडणवीस काय करणार?

नवनीत राणांना पाडणं हेच आमचं लक्ष्य आहे, असे मत कडू यांनी व्यक्त केले. अमरावतीतलं चित्र …

BJP च्या केंद्रीय मंत्र्याकडे नाही निवडणूक लढविण्यासाठी पैसे

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून आता सर्वच पक्षांकडून उमदेवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *