जे भ्रष्टाचारी आहेत. त्यांनाच भ्रष्टाचार दिसतो. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्याला पक्षात घ्यायचं हा भाजपचा गोरखधंदा आहे. चंद्रशेखर बावणकुळे हे स्वत: भ्रष्टाचारी आहेत. त्यामुळे यावर प्रतिक्रिया देण्याचं कारणच नाही, अस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले की, चोरांना सगळे चोरच दिसतात. भ्रष्टाचाऱ्यांना सगळे भ्रष्टाचारी दिसतात. गुजरातमधील मोरबी पुलाचं काय झालं. इंग्रजांनी बांधलेला पूल १६० वर्षात कोसळला नाही. गुजरात सरकारने रिपेरिंगला दिल्यानंतर कोसळला. पुलाच्या बांधणीसाठीच्या दोन कोटीपैकी केवळ १२ लाख रुपये खर्च कऱण्यात आला. हा भ्रष्टाचार कोणाचा, असा सवालही निरुपम यांनी केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारत जोडो यात्रेच्या खर्चबाबत खळबळजनक आरोप केले आहे. त्याला काँग्रेसकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.