कॅन्सर होऊ नये, यासाठी काय कराल…

कर्करोग हा शब्द जरी काढला तरी धडकी भरते. कर्करोग हे जगभरातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. जे अनेक कारणांमुळे असू शकते. यापैकी काहींवर आपले नियंत्रण नसते, परंतु अनेक कर्करोगांमागे आपल्या काही सवयी आणि जीवनशैली पूर्णपणे जबाबदार असल्याचे दिसून आले आहे.

आजच्या काळात, लोक त्यांच्या करिअरच्या प्रगतीसाठी अधिक परिश्रम घेतात. तर ते त्यासाठी तडजोडही करण्यास मागेपुढे बघत नाही. बदलेल्या जीवनशैलीनुसार व आपल्या करिअरसाठी लोक दिवसापेक्षा रात्रीचे काम करण्यास अधिक चांगले समजतात.

तंबाखू, प्रक्रिया केलेले अन्न आणि अल्कोहोलचे अतिसेवन केल्याने कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढतो. जर तुम्हाला या धोकादायक आजारापासून दूर राहायचे असेल तर त्यासाठी आजपासूनच काही सवयी टाळा. कॅन्सरसोबतच इतरही अनेक आजारांपासून ते तुम्हाला सुरक्षित ठेवेल. कॅन्सर हा शरीरातील अंतर्गत पेशीच्या बदलामुळेही होतो, असं म्हटलं जातं.

✳️धूम्रपान

धूम्रपानामुळे आरोग्याचे अनेक प्रकारे नुकसान होते. धूम्रपान हे केवळ फुफ्फुसाच्या कर्करोगाचे कारण नाही तर तोंड आणि घशासह इतर 14 प्रकारचे कर्करोग देखील होऊ शकते. म्हणूनच ही सवय लवकरात लवकर सोडा. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि मधुमेहाचा धोकाही अनेक पटींनी वाढतो. बिडी आणि सिगारेटमध्ये निकोटीन मुबलक प्रमाणात आढळते. जे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. जे लोक दीर्घकाळ धुम्रपान करतात त्यांना डोळ्यांमध्ये जळजळ होण्याची समस्या देखील असते, ज्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास तुमच्या रेटिनाला नुकसान होऊ शकते. जर तुम्ही उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही अजिबात धूम्रपान करू नये.

✳️वजन नियंत्रणात ठेवा

लठ्ठपणाशी निगडीत कर्करोगाचा धोका गेल्या काही वर्षांत जवळपास 40 टक्क्यांनी वाढला आहे. वजन वाढल्यामुळे शरीरात अनेक प्रकारचे आजार बळावू लागतात. एका संशोधनात असे समोर आले आहे की, ज्या महिलांचे वजन खूप जास्त आहे त्यांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका दुप्पट असतो. तुमचे वजन जास्त असल्यास, तुम्हाला एक किंवा दोन नव्हे तर १३ प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. त्यामुळे बाहेरचे खाणे, जंक फूड आणि तळलेले गोड पदार्थ यापासून दूर राहा.

✳️दारू

तज्ज्ञांच्या मते, जास्त मद्यपान केल्याने कॅन्सर तर होतोच, पण त्याचा कर्करोगावरील उपचारांवरही परिणाम होतो. म्हणजे अल्कोहोल प्यायल्याने कर्करोगाच्या उपचारांवर पूर्ण परिणाम होत नाही. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जास्त मद्यपान केल्याने अन्ननलिका, तोंड, व्हॉईस बॉक्स, यकृत, कोलोरेक्टल आणि स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. महिलांनी दारू प्यायल्यास त्यांच्या इस्ट्रोजेनची पातळी वाढते, ज्यामुळे त्यांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

✳️सनस्क्रीन लावा

त्वचेची काळजी घेण्याच्या दिनचर्येत सनस्क्रीन खूप महत्त्वाची भूमिका बजावते. सनस्क्रीन त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते. सनस्क्रीनमध्ये असलेली रसायने सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांना थेट त्वचेपर्यंत पोहोचू देत नाहीत. त्यामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका खूप कमी होतो.

About विश्व भारत

Check Also

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

आजपासून विदर्भात उष्णतेची लाट

  आजपासून २१, २२ आणि २३ एप्रिलला विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *