आजपासून २१, २२ आणि २३ एप्रिलला विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण राज्यातच उन्हाची काहिली आणखी वाढणार आहे. तर काही जिल्ह्यात हवामान विभागाने तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर मध्य महाराष्ट्रात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम असणार आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकानी काळजी घेण्याचे अवाहन राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने “यलो अलर्ट” कायम आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम असणार आहे.