आज दिनांक-१९/०४ २०२५ शनिवार रोजी शैक्षणिक सत्र 2024- 2025 मध्ये शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान अंतर्गत तपासणी करण्यात आली त्यामध्ये मूक बधिर निवासी सावनेर या शाळेची सावनेर तालुक्या मधून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये प्रथम क्रमांक करीता निवड झाली. शिक्षण विभाग पंचायत समिती सावनेर तर्फे नगरपरिषद हायस्कूल कळमेश्वर येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला.मा. आमदार श्री. आशिष देशमुख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व तीन लक्ष रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुवर्णा महाशब्दे यांनी स्विकारला.यावेळी संस्थेचे सचिव माननीय श्री नानाभाऊ समर्थ, संस्थेचे कोषाध्यक्ष श्री .निखिल समर्थ, संस्थेचे सहसचिव मा.डॉ.अमित चेडे, शाळेच्या वाचातज्ञ सौ. दुर्गा चेडे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी इत्यादींच्या उपस्थितीत स्विकारण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.आम्ही ठाकर ठाकर नृत्य सादर केले. सर्वांनी विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक केले.यावेळी पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल मा संस्थेचे संचालक मंडळ व शिक्षक.कर्मचारी व सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात आले.
