Breaking News

नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग : 6 विद्यार्थ्यांवर कारवाई

Advertisements

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात (मेडिकल)सिनियरकडून ज्युनियर विद्यार्थ्याची रॅगिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रॅगिंग प्रकरणी सहा सिनियर वैद्यकीय विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

Advertisements

प्राप्त माहितीनुसार, हा रॅगिंग झालेला ज्युनियर विद्यार्थी एमबीबीएस प्रथम वर्षाचा आहे. तर रॅगिंग घेतल्याचा आरोप असलेले सहा विद्यार्थी एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यानंतर इंटर्नशीप करणारे सिनियर्स आहेत. काही दिवसांपूर्वी सदर रॅगिंगचे प्रकार घडल्यानंतर पीडित विद्यार्थ्याने त्याची तक्रार आणि याविषयीचे काही पुरावे सेन्ट्रल रॅगिंग समितीकडे पाठविले होते. तपासांती सेंट्रल रॅगिंग समितीकडून मेडिकल रुग्णालय आणि महाविद्यालय प्रशासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा झाल्यानंतर रॅगिंगचा आरोप असलेल्या सहा विद्यार्थ्यांची ‘इंटर्नशिप’ रद्द करण्यात आली असल्याचे कळते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *