‘किस्मत अगर खराब हो तो ऊंट पर बैठे इंसान को भी कुत्ता काट लेता है’, अशी एक हिंदीत म्हण आहे. याचाच प्रत्यय एका घटनेतून आलाय. एका गरीब व्यक्तीला १ कोटी रुपयांची लॉटरी लागली. अचानक इतके पैसे जवळ आल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता या पैशांनी आपण चांगले आयुष्य जगू असा विचार त्याने केला. मात्र, त्याच्या या आनंदावर काही दिवसातच विरजण पडलं.
या व्यक्तीने लॉटरीत जिंकलेले पैसे घेऊन त्याच्या पत्नीने प्रियकरासोबत धूम ठोकली. दक्षिण आशियाई देश थायलंडमधून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथे एका व्यक्तीने लॉटरीत एक कोटी रुपये जिंकले होते. मात्र, पत्नीने हे पैसे घेऊन आपल्या प्रियकरासोबत धूम ठोकली. पत्नी आणि पैसे दोघेही गेल्याने पती खूप अस्वस्थ आहे.
पत्नी एक कोटी रुपये घेऊन प्रियकरासोबत पळून गेल्याची बातमी समजताच पतील धक्काच बसला आहे. या घटनेनंतर तो खूप अस्वस्थ आहे. घटनेनंतर त्याने पोलिस ठाणे गाठून पोलिसांकडे न्यायाची याचना केली. एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, थायलंडच्या इसान प्रांतात राहणाऱ्या मानित नामक व्यक्तीला १ कोटी रुपयांची लॉटरी लागली होती.
मानितच्या घरची परिस्थिती हलाकीची होती. त्यामुळे तो सतत लॉटरीची तिकिटं खरेदी करत होता. कधी ना कधी आपल्याला लॉटरी लागेल या आशेवर तो होता. अखेर मानितची प्रतिक्षा संपली त्याला १ कोटी रुपयांची लॉटरी लागली. दरम्यान, लॉटरीचे पैसे घेऊन मानित हा घरी आला. त्याने आपल्या पत्नीला अंगकानरतला ही खूशखबर सांगितली. आता आपण यापुढे चांगले आयुष्य जगायचे असा मानस दोघांनीही केला. रात्री गप्पागोष्टी करत दोघेही झोपून गेले.
दरम्यान मानित हा गाढ झोपेत असताना, त्याच्या पत्नीने लॉटरीचे पैसे घेऊन प्रियकरासोबत धूम ठोकली. या सर्व प्रकारानंतर मानितला मोठा धक्का बसला. त्याने तातडीने पोलिसांत धाव घेत पत्नीविरोधात फिर्याद दिली. मानित आणि अंगकानरत यांचा २६ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना ३ मुले देखील आहेत. मानितच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार पत्नीसह तिच्या प्रियकराचा शोध घेतला जात आहे.