Breaking News

२६ लाखांचा अपहार : सरपंचासह ग्रामसेवकाला अटक

धुळे जिल्ह्यातील जेबापूर (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीतील तब्बल सव्वीस लाखांच्या गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षांपासून फरार असलेले सरपंच व ग्रामसेवकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

दोघांनी ग्रामविकासाचा २६ लाख ३६ हजार ५० रुपयांचा निधी परस्पर काढून घेतला होता. जेबापूर (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीत १ एप्रिल २०१६ ते १७ जुलै २०१९ पर्यंत तत्कालीन सरपंच जगन्नाथ रामसिंग मालचे (रा. जेबापूर) व तत्कालीन ग्रामसेवक अनिल ऊर्फ बबल्या विश्वास सोनवणे यांनी संगनमताने १४ व्या वित्त आयोगामार्फत मंजूर झालेल्या रक्कमेतून १३ लाख ३३ हजार रुपये, पेसा निधीतून बारा लाख २७ हजार रुपये, ग्रामनिधीतून ५६ हजार ५५० रुपये, जैवविविधा निधीतून १९ हजार ५०० रुपये असा एकूण २६ लाख ३६ हजार ५० रूपये जनतेच्या फायद्यासाठी न वापरता दोघांनी युनियन बँकेच्या पिंपळनेर शाखेतून परस्पर काढून घेतले होते. याप्रकरणी साक्री पंचायत समितीचे तत्कालिन विस्तार अधिकारी अमृत पंडित महाले यांनी १३ ऑगस्ट २०२० ला पिंपळनेर पोलिसांत फिर्याद दिली. तेव्हापासून दोघे आरोपी फरारी होते. त्यांचा पिंपळनेर पोलिस कसून शोध घेतला. अखेर तब्बल दोन वर्षांनी पोलिसांना त्यांना शोधून अटक करण्यात यश आले आहे. त्यांना सोमवार (दि.26) पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

About विश्व भारत

Check Also

पुलिस ने रेप पीड़िता को 15 दिन घुमाया : SP से शिकायत होते मचा हड़कंप

पुलिस ने रेप पीड़िता को 15 दिन घुमाया : SP से शिकायत होते मचा हड़कंप …

२४ उपजिल्हाधिकाऱ्यांना नियमबाह्य बढती : मुख्य सचिवांकडे तक्रार

२४ उपजिल्हाधिकाऱ्यांना भारतीय प्रशासन सेवेत बढती देण्याचा प्रस्ताव दाखल करताना नियम डावलले असल्याची तक्रार महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *