जैन कलार समाजाच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीत मोठा घोळ झाल्याचा आरोप आपुलकी पॅनलचे अनिल तिडके यांनी पत्रकार परिषदेत केला.नागपूर धर्मादाय आयुक्त कार्यालयात यासंदर्भात तक्रार केल्याची माहिती तिडके यांनी दिली.
काय आहे प्रकरण?👇👇👇
26 डिसेंबरला समाजाची निवडणूक झाली. 27 डिसेंबरला मतमोजणी अपेक्षित होती. मात्र, तसे न होता तीन दिवसांनंतरही संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून निकाल घोषित करण्यात आलेला नाही. याच काळात घोटाळ्यांनी कूच केली. एकूण सभासद 18 हजार होते. पैकी 11 हजार 127 सभासदांनी मतदान केले. निकाल विलंबाने घोषित करणे, हीच बाब घोटाळा दर्शविते. पुन्हा निवडणूक झाल्यास सत्ताधारी कार्यकारणीकडून खर्च वसूल करावा, अशी मागणीही तिडके यांनी केली.