रामटेक लोकसभा व विधानसभा क्षेत्रातील देवलापार आदिवासी भागातील छवारी आणि छवारीटोला या गावातील ग्रामस्थांनी मनसेत प्रवेश केलाय. रामटेक तालुक्याचा विकास थांबला असून यास विद्यमान आमदार आणि खासदार जबाबदार आहेत, असा आरोप करीत अनेकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व पक्षाचे रामटेक तालुका अध्यक्ष शेखर दुंडे यांच्यावर विश्वास दाखविला आहे.
त्यांच्या बेधडक कार्यप्रणालीमुळे ग्रामस्थांचे सुटणारे प्रश्न लक्षात घेऊन, विद्यमान खासदार व आमदारांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करीत भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साथ देण्याचा विश्वास ग्रामस्थांनी दाखविला आहे.गावातील अनेक समस्या दुंडे यांनी अधिकारी वर्गाला तात्काळ कळवून मार्गी लावण्याचे ग्रामस्थांना सांगितले.
यात प्रितम सिंह कटरे, भिमराव मराठे, इदपाल मशीया, चंद्रकला बाई घराडे, शामराव गराड, लखन उरमाली, दर्शन गिरी, महेश धुर्वे, नितेश गिरी, शोभाबाई धुर्वे, विजय धुर्वे, राजु उरमाली, हनुमान मराठे, शाम गराडे, लखन उरमाली, विजय धुर्वे अशा अनेक ग्रामस्थ महिला-पुरुष आणि युवकांनी पक्षप्रवेश घेतला. यावेळी पक्षाचे अनेक पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.