Breaking News

नागपूर आरटीओ रवींद्र भूयारांनी महिला अधिकाऱ्याचा केला लैंगिक छळ : चौकशी सुरु

Advertisements

नागपूर शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याने गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी परिवहन आयुक्तांनी महिला तक्रार निवारण समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. रवींद्र भुयारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

Advertisements

तक्रारदार महिलेचे आरोप बिनबुडाचे आहेत. चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीला सामोरे जाणार असून, तिथे बाजू मांडणार आहोत, असे भुयार यांनी सांगितले.

Advertisements

प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) या पदावर कार्यरत असलेले रवींद्र भुयार यांनी एका महिला मोटर वाहन निरीक्षकाचा लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल झाली.पीडित महिला ही मोटर वाहन निरीक्षक असून, तिने या संदर्भात राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्याकडे लेखी तक्रार दिली. प्रकरणाचे गांभीर्य पाहाता प्रशासनाने तत्काळ दखल घेत राज्याच्या महिला तक्रार निवारण समितीला चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.

तक्रार काय आहे?

नागपूर आरटीओ कार्यालयात कार्यरत असणाऱ्या पीडित महिलेने कार्यालयात काम नसताना भुयार हे तासन् तास बसवून ठेवतात व स्त्री लज्जा वाटेल असे विनोद करतात. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडतील अशी वक्तव्य करतात अशी तक्रार केली आहे. “माझे अनेक परपुरुषांशी लैंगिक संबंध आहे. माझा मुलगा पतीपासून नव्हे, तर दुसऱ्या पुरुषापासून झालेला आहे. त्याची डीएनए टेस्ट झाली आहे’, अशा प्रकारची वक्तव्य भुयार हे समाजात पसरवत असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे.

खोटी तक्रारची धमकी

कार्यालयाचे वाहन असतानाही मला घरी सोडायला सांगतात. लाँग ड्राईव्हला जाऊ असं बोलतात. चहाचे निमित्त करून घरात घेऊन जातात. रात्री उशिरापर्यंत घरी बसतात. मी नकार दिला की, लाचलुचपत विभागाकडे खोटी तक्रार करण्याची धमकी देतात. रात्री 12 वाजता, 10 वाजता, सकाळी 7 वाजता कॉल करतात. तुम्ही चाळीशीच्या वाटत नाही, कॉलेजमधील मुलगी वाटता, असे बोलतात, असेही तक्रारीत म्हटले आहे. “हा त्रास सहन न झाल्याने मी माझ्या पतीला आणि भावाला सांगितले. 9 जानेवारी 2023 रोजी माझ्या भावाने या सगळ्या गोष्टींबद्दल भुयार यांना विचारणा केली. तिथे नागपूर ग्रामीणच्या अधिकाऱ्यासह इतरही अधिकारी होते. त्यांच्यासमोर भुयार यांनी माफी मागितली आणि पुन्हा असे करणार नाही, असे सांगितले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शिकायत के खिलाफ श्रमिक नेता बाजनघाटे की ओर से कानूनी नोटिस जारी

शिकायत के खिलाफ श्रमिक नेता बाजनघाटे की ओर से कानूनी नोटिस जारी नागपुर। महानिर्मिती कोराडी …

श्रीवासनगर में हर्षोल्लास के साथ मनाई डॉ.बाबासाहेब की जयंती

श्रीवासनगर में हर्षोल्लास के साथ मनाई डॉ.बाबासाहेब की जयंती   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *