Breaking News

‘पीडब्लूडी’च्या कार्यकारी अभियंत्यांचे गडचिरोलीतील रस्त्यांकडे दुर्लक्ष : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील नागरिक त्रस्त

✍️मोहन कारेमोरे

सार्वजनिक बाधकाम विभागाचा (पीडब्लूडी) गलथानपणा पुन्हा उघडकीस आला आहे. गडचिरोलीसारख्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिल्ह्यातील रस्ते निकृष्ट बांधकाम करून पीडब्लूडीने नवा चुकीचा पायंडा घालून दिला आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या गढचिरोली जिल्ह्यातील रस्ते पीडब्लूडीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते कामांना स्थगिती उठवून तातडीने मंजुरी द्यावी. जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. हिवाळी अधिवेशनात अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना गडचिरोलीतील रस्त्यांच्या कामाना स्थगिती उठविण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला होता. मात्र, अजूनही स्थगिती उठविण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांची टाळाटाळ

जारवण्डी ते एटापल्ली आणि पेंढरी ते पखांजूर(छत्तीसगड़ सीमा) हा रस्ता गड़चिरोली पीडब्लूडीच्या अख्यातरित येतोय. मात्र,पीडब्लूडीचे कार्यकारी अभियंता साखरवाड़े यांच्याशी संपर्क साधला असता ते वरील रस्ता माझ्याकडे येत नाही, असे सांगितले.तर, बोल्लेहा मार्ग कुणाकडे येते, याची माहिती जाणून घेण्यासाठी ‘विश्व भारत’च्या प्रतिनिधीनी कार्यकारी अभियंता उसेंडी यांना फोन केला. परंतु,उसेडी यांनी फोन उचलला नाही.तसेच अधीक्षक अभियंता यांच्याकडून कोणत्याही रस्ते कामाचा आढावा घेण्यात येत नसल्याचे कळते.

मुख्य अभियंते दशपुत्रे यांनी घेतली दखल

मुख्य अभियंते दशपुत्रे यांना फोन केला असता त्यांनी चौकशी करणाऱ्याचे तात्काळ आदेश दिले. तसेच कार्यकारी अभियंत्यांना कामाचा अहवाल सादर करण्याचे सांगितले. रस्ते कामात हयगय करू नये,अशा स्पष्ट सूचना दशपुत्रे यांनी दिल्या.

About विश्व भारत

Check Also

वन अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी लाखोंचा व्यवहार : मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

राज्यातील वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ निर्माण झाला असून घोडेबाजार देखील सुरू झाला …

राज्यातील धोकादायक पर्यटनस्थळे बंद ठेवा : मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे आदेश

राज्यातील धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद करण्याचे आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत. पोलीस, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *