Breaking News

भंडाऱ्यात ‘पठाण’ चित्रपटाचे पोस्टर जाळले : हिंदू संघटना आक्रमक

Advertisements

भंडारा शहरातील आदर्श सिनेमागृहात बुधवारी पठाण चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या निषेधार्थ सिनेमागृहासमोर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू जागरण मंच, हिंदू महासभा,हिंदू रक्षा मंच, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत विरोध केला.

Advertisements

कार्यकर्त्यांनी पठाण सिनेमाचे पोस्टर जाळले. पोस्टरवर काळी शाही फेकून निषेध नोंदविला. यावेळी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. भंडारा पोलिसांच्या समयसुचकतेने पुढील अनर्थ टळला.

Advertisements

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर “पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांना खूप आवडली आहेत. चित्रपटात दीपिका, शाहरुख आणि जॉनचे दमदार स्टंट पाहायला गर्दी होत आहे. पण बेशरम रंग या गाण्याने हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

या चित्रपटातील “बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झाल्यापासूनच काही ठिकाणी त्याला कडाडून विरोध करण्यात आला आहे. या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या कपड्यांवर आक्षेप घेण्यात आला. सोशल मीडियावरही या सर्व प्रकरणात दोन गट पडलेले होते. यामध्ये काहींनी पठाणला समर्थन दिले आहे तर काहींनी जोरदार विरोध केला आहे. अशातच ‘पठाण’ विरोधात भंडाऱ्यात बजरंग दलासह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून येत आहे. ‘पठाण’ ला सुरुवातीपासूनच विरोधाचा सामना करावा लागत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

हेमा मालिनी की संपत्ति बढ़ी, 129 करोड़ की मालकिन, पास हैं इतने करोड़ के गहने है।

हेमा मालिनी की संपत्ति बढ़ी, 129 करोड़ की मालकिन, पास हैं इतने करोड़ के गहने …

विनयभंगाच्या सीनआधी माधुरी दीक्षितने काय केले? वाचा

प्रसिद्ध अभिनेते रणजीत यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका केल्या. बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध खलनायक रणजीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *