Breaking News

नागपूरमध्ये 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त : दीक्षाभूमी, संघ मुख्यालय, टेकडी मंदिरावर नजर

गुप्तचर विभागाने प्रजास्ताक दिनानिमित्त राज्यात घातपात होण्याची शक्यता वर्तविली असल्यामने नागपूर पोलीस सतर्क आहे. नागपुरात 3 हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात घातपात होऊ शकतो, असा इशारा गुप्तचर विभागाने दिला. त्यामुळे राज्य पोलीस दल सतर्क झाले असून कालपासूनच नागपूर पोलिसांचा उपराजधानीत कडेकोट बंदोबस्त आहे. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येलाच पोलीस आयुक्‍तांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला. सुरक्षेसाठी तैनात जवानांना फिक्‍स पॉइंटवर नेमून दिले आहे.

प्रजासत्ताकदिनाचा आनंद साजरा करताना तरुणाईंनी कोणत्याही प्रकारचा उन्माद करू नये म्हणून गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांचे पथक नेमले आहे. गर्दी आणि बाजाराच्या ठिकाणी महिला पोलिसांची विशेष नजर राहणार असून अनुचित प्रकारास प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. संवेदनशील ठिकाणी सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहे. तसेच रेल्वेस्थानक, बसस्थानक, दीक्षाभूमी, संघ मुख्यालय, मॉल, मल्टिफ्लेक्‍स सिनेमागृहे, टेकडी मंदिर यासह अन्य धार्मिक स्थळीही पोलिसांची मोठ्या प्रमाणात नेमणूक करण्यात आली आहे.

About विश्व भारत

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *