Breaking News

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना तहसिलदारांचा दणका

Advertisements

भाजपचे नेहमी चर्चेत असलेले आमदार गोपीचंद पडळकर आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांना मिरज तहसीलदार दगडू कुंभार यांनी चांगलाच दणका दिला आहे.

Advertisements

मिरजमधील वादग्रस्त जागेवर संबंधित मिळकतदारांचा हक्क देण्याचा आदेश तहसिलदारांनी मान्य केला आहे. तसेच ब्रम्हानंद पडळकर यांना या निकालाबाबत न्यायालयामध्ये दाद मागण्याचीही मुभा दिली आहे.

Advertisements

प्रकरण काय?

7 जानेवारीला मध्यरात्री मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील दुकाने, हॉटेल जेसीबीच्या साह्याने पाडले आणि बेकायदेशीरपणे या जागेचा ताबा घेण्याच्या प्रयत्न केला असा आरोप ब्रह्मानंद पडळकर यांच्यावर करण्यात आला आहे. या पाडकामात त्यांनी जवळपास 10 आस्थापनांचं नुकसान केलं होतं. या प्रकरणात ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह 100 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर या प्रकरणात तहसिलदारांपुढेही सुनावणी सुरु होती. अखेर आज तहसिलदार दगडू कुंभार यांनी या प्रकरणात मिळकतदारांच्या बाजूने निकाल दिला आहे. या जागेवर संबंधित मिळकतदारांचाच कब्जा असल्याचा निकाल तहसिलदारांनी दिला आहे. तसेच ब्रम्हानंद पडळकर यांना या निकालाबाबत न्यायालयामध्ये दाद मागण्याची मुभा देण्यात आलेली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SP के निर्देश पर गौतस्करी के खिलाफ ज्ञापन सौपते ही पुलिस विभाग की बड़ी कार्यवाई 

पुलिस अधीक्षक के निर्देश पर गौतस्करी के खिलाफ ज्ञापन सौपते ही पुलिस विभाग की बड़ी …

रामटेकमध्ये सेनेचा पराभव होण्याची भीती? भाजपचा ‘प्लॅन’ काय आहे?

रामटेक लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव होतोय, अशी शक्यता महायुतीच्याच अंतर्गत सर्वेक्षणातून वर्तवली आहे. पक्षाचा पराभव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *