Breaking News

गडचिरोली-छत्तीसगड सीमेवर गायींची अवैध विक्री : शिंदे लक्ष देणार काय?विखे पाटील ‘महसूल’मध्ये रमले

Advertisements

✍️मोहन कारेमोरे : संपादक✍️

Advertisements

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील पेंढरी रस्ता आणि छत्तीसगडच्या सीमेवरील बठेहार या गावातून गायींची बेकायदेशीर खरेदी-विक्री केली जात आहे. याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील लक्ष देतील काय, असा प्रश्न आहे. विखे पाटील यांच्याकडे महसूल खात्याचा पदभार आहे. तर, पशुसंवर्धन खात्याचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे आहे. मात्र, महसूल कडे अधिक लक्ष तर पशुसंवर्धनकडे दुर्लक्ष विखे पाटील करीत असल्याचा आरोप होत आहे.

Advertisements

अलीकडेच गुजरात हायकोर्टाने गायीच्या अवैध वाहतूक आणि हत्येसंदर्भात एक महत्त्वाचे विधान केले आहे. देशातील गोहत्या थांबली तर पृथ्वीवरील सर्व समस्या सुटतील, असे मत तापी जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश समीर विनोदचंद्र न्यास यांनी व्यक्त केले होते. महाराष्ट्रातील एका २२ वर्षीय तरूणाला अवैधरित्या गायीची वाहतूक केल्याच्या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने हे मत व्यक्त केले होते. तसेच गोहत्या बंदिवर विविध न्यायालयाने अनेक निर्णय दिले आहेत. तरीही, महाराष्ट्र सरकार गोहत्या बंदिवर पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नसल्याचे दिसते. गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात शस्त्र घेऊन गुंड प्रवृत्तीचे काही नागरिक गायीची कत्तल करण्यासाठी खरेदी-विक्री करीत असल्याचे दिसून आले आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शिंदे सरकारने कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदू संघटनानी केली आहे.

कोर्टाने काय म्हटले?

गायीचे महत्त्व सांगताना न्यायालयाने सांगितलं की, ‘आपल्या धर्माची उत्पत्ती गायीपासून झालेली आहे. गायीच्या शेणापासून बनवलेल्या घराला एटोमिक रेडिएशनचा सुद्धा काही फरक पडत नाही. त्याचबरोबर गोमूत्राचा सुद्धा अनेक रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयोग होतो’ असं मत न्यास यांनी व्यक्त केलं. पण त्यांच्या या दाव्याला त्यांनी कोणताही वैज्ञानिक आधार दिला नाही.

निकाल देताना कोर्टाने एका संस्कृत श्लोकाचा हवाला दिला आहे. वेदांची उत्पतीसुद्धा गायीच्या अस्तित्वामुळेच झाली असून जगातून गाय नष्ट झाली तर विश्वाचे अस्तित्व नष्ट होईल असं म्हणत गोहत्या आणि गायींची बेकायदेशीर वाहतूक ही सुसंस्कृत समाजासाठी लांछनास्पद गोष्ट असल्याचं मत कोर्टाने व्यक्त केलं आहे. आपल्या गुजराती भाषेतील 24 पानांच्या निकालात कोर्टाने हे निरीक्षणे नोंदवली आहेत.दरम्यान, जुलै 2020 मध्ये 16 हून अधिक गायी एका ट्रकमध्ये बेकायदेशीरपणे वाहून नेत असताना अटक करण्यात आलेल्या मोहम्मद आमीन आरिफ अंजुमच्या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने ही निरीक्षणे नोंदवली. त्यांना दोरीने बांधून अन्नपाण्याविना वाहून नेण्यात येत होते. त्यानंतर त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने आरोपीला ५ लाखांच्या दंडासहित जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर लोकसभा निवडणुकीतील मतदान कमी झाल्याचा मुद्दा नागपूर हायकोर्टात!

नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी पाच लाखांच्या अंतराने जिंकून येतील, असा दावा भाजपतर्फे केला जात …

कांग्रेस विधायक का बेटा ED की गिरफ्त में, मनी लॉन्ड्रिंग मामले में बड़ी कार्रवाई 

कांग्रेस विधायक का बेटा ED की गिरफ्त में, मनी लॉन्ड्रिंग मामले में बड़ी कार्रवाई टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *