Breaking News

जिल्हाधिकाऱ्यांची बदली : कर्मचाऱ्यांना मागितले पैसे

Advertisements

कर्मचाऱ्यांकडून 1 हजार रुपयांची वर्गणी जमा करण्याचा वादग्रस्त आदेश देणाऱ्या दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आश्विन चंद्रू ए. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून 1 हजार रुपये देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे.

Advertisements

गोवा सरकारमधील अव्वर सचिव एहांत सावंत यांनी राज्यपालांच्यावतीने हा आदेश जारी केला आहे. ज्योती कुमारी यांची सध्या गोवा मनोरंजन सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisements

कुमारी यांनी हा वर्गणी गोळा करण्याचा आदेश जारी केला होता. हा आदेश समाज माध्यमावर व्हायरल झाल्यावर एक मोठा गदारोळ माजला होता. महसूल मंत्री बाबुश मोंसेरात यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.तसेच कुमारी यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

भाजप आमदाराच्या ‘पीए’ची अधिकाऱ्याला शिवीगाळ : जंगल सफारी

भाजपचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचे स्वीय सहायक (पीए) महेश प्रेमळवार यांनी व्यवस्थापन कोट्यातील …

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं टेकचंद्र शास्त्री: 9822550220   बिहार। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *