Breaking News

महाराष्ट्रात मुंगसाची शिकार, गुजरातच्या चौघांना अटक

Advertisements

नाशकातील दिंडोरी तालुक्यातील अकराळे परिसरातील न्याहारी डोंगराच्या राखीव वन क्षेत्रात मुंगसाची शिकार करणाऱ्याना वनविभागाने जेरबंद केले.

Advertisements

प्रकरण असे…

Advertisements

दिंडोरी तालुक्यातील नाशिक कळवण रस्त्यालगत असणाऱ्या ऐतिहासिक न्याहारी डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाचे राखीव वनक्षेत्र आहे.या परिसरात गेल्या काही दिवसापासून वन्य प्राण्यांची शिकार केली जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानुसार गुरुवारी गुजरात राज्यातील पाच संशयताच्या टोळीने न्याहारी डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाच्या क्षेत्रात दोन मुंगसाची शिकार केली. त्यानंतर पलायन करण्याच्या तयारीत असताना स्थानिकांच्या खबरीवरून त्यांना रंगेहात पकडण्यास उमराळे वन विभागाला यश आले आहे. पाच संशयित हे गुजरात राज्यातील असून शिकार करण्यास प्रतिबंध असलेल्या मुंगसाची शिकार केल्याने त्यांना वनविभागाने अटक केली. यामध्ये पंडित काशिनाथ दिवा, ऋतिक अर्जुन भोगे, तेजस कासू रिजड, संतोष अर्जुन भोगे (रा. गुजरात) या संशयित इसमाचा समावेश आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 पटना। …

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नासिक। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *