Breaking News

चीन भारताला घाबरतोय

Advertisements

“चीनला भारतावर आक्रमण करणे सोपी नाही. भारताकडे सुसज्ज शस्त्र आहे. भारत आज जगाचे नेतृत्व करीत आहे. अमेरिका, रशियानंतर उत्कृष्ट आणि अचूक अंदाजावर मारा करणारे क्षेपणास्त्रही भारताकडे आहे. त्यामुळे कोणत्याही शत्रू राष्ट्राला घाबरण्याची गरज नाही,”असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष सल्लागार डॉ. दिपक वोहरा यांनी केले.

Advertisements

विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे डॉ. दिपक वोहरा यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितासोबत व्हीएमएच्या ‘ऑगमेंट’ सत्रांतर्गत ‘2025 मध्ये जग आणि भारतासाठी व्यवसायाच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले.

Advertisements

तर, “भारताची संरक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधेत प्रगती होत आहे. 2003 पासून भारताने जगाकडून कर्ज घेणे बंद केले आहे. भारतात रस्त्यांची कामे खूपच जलदगतीने होत आहेत. कृषीच्या उत्पादनात आपण आत्मनिर्भर होत आहॊ,” अशा विविध विषयावर डॉ. वोहरा यांनी भाष्य केले. विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र गिरधार यांनी सन्मानचिन्ह देऊन डॉ. वोहरा यांचे स्वागत केले.

कोण आहेत डॉ. वोहरा?

पंतप्रधान, लेसोथो, दक्षिण सुदान आणि गिनी-बिसाऊ आणि लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल, कारगिल आणि लेह यांचे विशेष सल्लागार असलेले डॉ. दीपक वोहरा हे पंतप्रधान कार्यालयासाठी तंत्रज्ञान सल्लागार म्हणून ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून कार्यरत आहे. ते आर्मेनिया, जॉर्जिया, सुदान, दक्षिण सुदान, पोलंड आणि लिथुआनिया येथे भारताचे माजी राजदूत होते. फ्रान्स, व्हिएतनाम, ट्युनिशिया, युनायटेड स्टेट्स, नायजेरिया, कॅमेरून, बेनिन, चाड, मलेशिया, पापुआ न्यू गिनी आणि स्पेनमध्ये त्यांनी सेवा दिली. राजदूत वोहरा फ्रेंच, स्पॅनिश, व्हिएतनामी, अरबी, बहासा मेलायू, हौसा, मोटू आणि आर्मेनियन या भाषा अस्खलितपणे बोलतात.

जगातील सर्वात मोठ्या एनजीओ असलेल्या सुलभ इंटरनॅशनलशी ते 4 वर्षे संलग्न होते. 1973 च्या भारतीय परराष्ट्र सेवेच्या वर्गाचे माजी विद्यार्थी असलेलं वोहरा जगातील सर्वोत्कृष्ट विचारवंतांमध्ये गणले जातात. वोहरा यांची शिक्षणाची पार्श्वभूमी आदर्शवत आहे. त्यांनी सेंट स्टीफन्स कॉलेज, नॅशनल डिफेन्स कॉलेज आणि सॉर्बोन युनिव्हर्सिटी, पॅरिस यासह भारतातील आणि परदेशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमधून पदवी प्राप्त केली आहे.

वोहरा यांनी 1972-73 पर्यंत दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये अध्यापन केले आहे. त्याच्या योगदानाचा सन्मान म्हणून, आर्मेनियाने त्यांना उत्कृष्टतेबद्दल सुवर्णपदक दिले आणि एका शाळेचे नाव त्याच्या नावावर ठेवले. सुदानने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान दिला आणि त्यांना आफ्रिकन जमातीचा ‘प्रिन्स’ बनवण्यात आले होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

श्रीक्षेत्र कोराडी तीर्थ हनुमान मंदिर प्रांगण में अभि इंजिनियरिंग कार्पोरेशन की ओर से संगीतमय सुंदरकांड

श्रीक्षेत्र कोराडी तीर्थ हनुमान मंदिर प्रांगण में अभि इंजिनियरिंग कार्पोरेशन की ओर से संगीतमय सुंदरकांड …

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिर संपन्न

भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या जयंती प्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिर संपन्न टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *