देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या अनेक गोष्टी अजूनही महाराष्ट्रात चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी फडणवीसांच्या विधानाने ही घटना पुन्हा केंद्रस्थानी आली. पण सगळ्या घटनांचे साक्षीदार असलेले माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याबद्दल कधीही बोलले नाही. राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर कोश्यारींनी पहाटेच्या शपथविधीबद्दल एका चॅनेलवर भाष्य केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी शरद पवारांनाही सुनावले आहे.
शपथविधी…
राज्यपाल कुणाला बोलवत नाही. हे काम राज्यपाल करत नाही. हे सरकार करतं आणि ज्याला शपथ घ्यायची असते, तो करतो. जे काही झालं, त्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की, मी ज्यांना शपथ दिली, देवेंद्र फडणवीस यांना. त्यांनी यासंबंधी त्यांची भूमिका अगोदरच स्पष्ट केली आहे. मला वाटत त्या भूमिकेनंतर यात मी कुठे मध्ये येतो, असेही कोश्यारी म्हणाले.
शरद पवार यांच्याविषयी काय म्हणाले…
जर शरद पवारांसारखे इतके मोठे व्यक्ती जर आणि तर वर चालत असतील, तर मी म्हणेन की, तर मग त्यांनी कोर्टात जे लवासाचं प्रकरण आहे. त्यावर दहा वेळा विचार करायला हवा. कोर्टाने काय म्हटलं आहे त्याबद्दल. ते इतके मोठे व्यक्ती आहे. त्यांचा मी सन्मान करतो. माझ्या हस्ते त्यांना दोन वेळा डी. लिट दिली गेली. मी त्यांचा आदर करतो. ते जर असं बोलत असतील, तर ते राजकीय बोलत आहेत, असेही कोश्यारी म्हणाले.