Breaking News

बीडीओ निलंबित : विहीर मंजूरीसाठी शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी; सरपंचाने केली नोटांची उधळण

विहीर मंजूर करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील फुलंब्री पंचायत समितीचे गटविकास (बीडीओ) अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना पैसे मागितले. त्यामुळे संतप्त सरपंचाने पंचायत समिती कार्यालयासमोर नोटा उधळत आंदोलन केल्याची घटना फुलंब्री तालुक्यात शुक्रवारी (ता.31) घडली. यात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी बीडीओ ज्योती कवडदिवे यांना तात्काळ निलंबित केले आहे.

काय आहे प्रकरण?

गेवराई पैधा गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी गळ्यात दोन लाख रुपयांच्या नोटांची माळ घालून पंचायत समिती बीडीओचा निषेध केला.

तसेच पंचायत समिती कार्यालयासमोर नोटा उधळण केली.

विहिरी मंजूरीसाठी अधिकारी शेतकऱ्यांना पैसे मागत आहेत, अशी तक्रार शेतकऱ्यांनी सरपंच साबळे यांच्याकडे केली होती. याच घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

“मी अपक्ष सरपंच झालो आहे. मी निवडणुकीत पैसे वाटले नाहीत, विहीर मंजूरीसाठी शेतकऱ्यांना कुठल्या तोंडांनी पैसे मागू.

तुम्ही जर एखाद्या सभापतीचं, एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल तर मायबापाहो गरिबांचं काम कोण करणार? गरिबाला कोण वाली आहे?” असा प्रश्न साबळे यांनी उपस्थित केला.

राज्य सरकारच्या विहीर अनुदान योजने अंतर्गत गेवराई पैधा गावाचे शेतकऱ्यांनी पंचायत समिती बीडीओकडे विहीर मंजूरीसाठी अर्ज केला होता.

परंतु बीडीओने विहीर मंजूरीसाठी पैशाची मागणी केल्याचा आरोप सरपंच साबळे यांनी केला.

About विश्व भारत

Check Also

मंत्र्याच्या आग्रहावरून जिल्हाधिकाऱ्यांची बदली

उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने एमपीडीए कायद्याचा बेजबाबदारपणे वापर केल्याचा ठपका ठेवल्यापासून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद चांगलेच …

दोन न्यायाधीश निलंबित : मुंबई हायकोर्टाचा निर्णय

सातारा जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम आणि पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख या दोघांना सेवेतून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *