Breaking News

IPL मध्ये ग्लॅमरस चीअर लीडर्सची निवड कशी होते?कोणत्या सुविधा मिळतात? वाचा…!

इंडियन प्रीमियर लीग सुरू होऊन दोन आठवडे झाले. प्रतिभेला संधी मिळवून देणारी स्पर्धा असे आयपीएलचे वर्णन. या स्पर्धेमुळे कित्येक उदयोन्मुख खेळाडूंना जगभरातील नावाजलेल्या खेळाडूंसोबत खेळण्याची, त्यांच्याकडून क्रिकेटमधील लहानसहान बारकावे शिकण्याची संधी मिळाली. अनेक तरुण खेळाडूंना व्यासपीठ मिळाले. चीअर लीडर्समुळे या स्पर्धेला ग्लॅमरचा तडका मिळाला.

सुंदर आणि ग्लॅमरस चीअर लीडर्समुळे आयपीएलला चारचाँद लागले. सामन्यादरम्यान प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी चीअर लीडर्स पार पाडतात. यातील बहुतांश चीअर लीडर्स परदेशांमधील आहेत. त्यांना उत्तम मानधन मिळतं. चीअर लीडर्सची निवड करताना काही प्रमुख निकषांचा विचार केला जातो.

किती मानधन?

आयपीएलमधील एका चीअर लीडरला प्रत्येक सामन्यासाठी 14 ते 17 हजार रुपये इतकी रक्कम मिळते. त्यांची कामगिरी उत्तम असल्यास आणि त्यांचा संघ जिंकल्यास त्यांना बोनसदेखील मिळतो. पगारासोबतच त्यांना आणखी काही सोयीसुविधाही मिळतात. त्यांच्या मुक्कामाची सोय सर्वोत्तम हॉटेलांमध्ये केली जाते. फ्रँचायजींकडूनच त्यांना उत्तम जेवण पुरवलं जातं.

आयपीएलमध्ये चीअर लीडर म्हणून काम करायचं असल्यास डान्स, मॉडेलिंग आणि शेकडो प्रेक्षकांसमोर नृत्य सादरीकरण करण्याचा अनुभव आवश्यक असतो. एखाद्या ग्रुपचा भाग असल्यास आणि ग्रुपसोबतच ऑडिशन दिल्यास ती जमेची बाजू ठरते. चीअर लीडरसाठीची प्रक्रिया बरीच मोठी आहे. त्यासाठी अनेक मुलाखती द्याव्या लागतात. सोबत लेखी मूल्यांकनही केले जाते.

About विश्व भारत

Check Also

“त्याने माझ्या स्तनांना स्पर्श केला अन्…” : अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग

‘हीरामंडी’ या वेब सीरिजची चर्चा अजूनही कायम आहे. १ मेला प्रदर्शित झालेल्या या सीरिजला आता …

इंदौर से निकलकर, देश और दुनियाभर में नाम कमाने वाले 8 सेलिब्रेटी

खाने के शौक़ीनों और देश का सबसे साफ़-सुथरा शहर… इंदौर. इतिहा,स की कई दिलचस्प कहानियों …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *