उद्योजक नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमाला देशविदेशातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी ऐश्वर्या आणि आराध्या देखील उपस्थित होत्या. या दोघींसोबत अभिषेक बच्चन नव्हता. दोघींच्या फोटोवर चाहत्यांनी अनेक कॉमेन्टस केल्या.
या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खान उपस्थित होता. कार्यक्रमातील एका व्हिडीओने मात्र, चाहत्यांना थक्क केले.
व्हायरल झालेल्या डीओमध्ये अनेक वर्षांनंतर सलमान आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले. सलमान खान आणि ऐश्वर्या रायला असे एकत्र पाहून चाहते खूश झाले. मात्र त्यांचा हा आनंद काही क्षणासाठी होता. कारण दोघांना व्हिडिओ एडिट केलेला आहे. तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाचीही चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
कधी झाले लग्न?
घटस्फोटाच्या चर्चांनी सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या जोडीला पसंत करणारे चाहते, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित करत आहेत. खरे तर बॉलीवूडमधील सर्वात रॉयल कपल म्हणून ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांची ओळख आहे. त्यांनी २००७ साली लग्न केले. लग्नानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याबद्दल याआधीही अनेक चर्चा रंगल्या. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक अनेक वर्ष चर्चेत राहिले.