समाजातील संपूर्ण युवा वर्ग एकत्रित यावा व नव्याने उर्जा निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजातर्फे प्रीमियर लीग सिझन -८ टुर्नामेंटचे आयोजन “ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय,क्रीडा चौक,हनुमान नगर,नागपूर” येथे आयोजित करण्यात आले होते.हे टुर्नामेंट सलग दिनांक २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालले.यात विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील संघानी भाग घेवून समाजाप्रती व खेळाप्रती जागृकता निर्माण करून एक चांगले वातावरण निर्माण केले व याचा भरपूर आनंद संपूर्ण समाजबांधवांनी मोठ्या उत्साहाने घेतला.या अनुषंगाने दिनांक १ फेब्रुवारी २०२६ ला अंतिम सामना घेण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.त्याचप्रमाणे यावेळी संघ प्रमुख,आयोजक,खेळाडूंसह अनेक मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या टुर्नामेंटचा अंतिम सामना डिकेडी लॉयन्स विरुद्ध श्रीनिका शैशा किंग्ज यांच्यात झाला व यामध्ये डिकेडी लॉयन्स संघ विजयी झाला. याप्रसंगी विजेत्या संघाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस ४१००० रूपये रोख रक्कम देण्यात आले व उपविजेत्या संघाला २१००० रूपये रोख रक्कम देण्यात आले व मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक रेसिंग सायकल ही लांजेवार सायकल स्टोअर्स यांच्याकडून देण्यात आली.त्याचप्रमाणे बेस्ट बॉलर, बेस्ट कॅचेस,बेस्ट विकेट घेणाऱ्या खेळाडूंचा सुध्दा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे विजेत्या व उपविजेत्या संघातील संपूर्ण खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. विजेत्या संघाचे संघ प्रमुख पंकज खानोरकर, पंकज दहीकर, मयूरेश दडवे यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन युथ फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन राकेश मासुरकर यांनी केले या कार्यक्रमाला मान्यवरांमध्ये प्रामुख्याने अनिलजी तिडके, सुधीरजी फटिंग, अक्षय तिडके, राजेश पालांदुरकर, सचिन दहीकर, माधुरीताई घोसेकर, प्रमोद पलांदुरकर, रमेश लांजेवार, मुकेश बारापात्रे, विनोद लांजेवार, भुषण दडवे,काशिनाथ ठवरे, विरेश दुरूगकर, प्रकाश भांडारकर, निखिल हरडे,राहुल शेंडे, राकेश शिरपुरकर, प्रदिप होरे,पारस मोरघरे, मंगेश खाणोरकर, दर्शन शनिवारे, अक्षय खाणोरकर,महेश तिडके, स्वप्निल रहाटे, हरीश माटे, मोहन मासुरकर, नितिन दहीकर, रीषभ डवले,हरिष मुरकुटे, अनुप हरडे,प्रलोक मोटघरे, हर्षल कावळे, राकेश शिरपुरकर, श्वेतांग खोब्रागडे,दिप दहीकर,कुणाल घोसेकर, स्वप्निल रनदिवे,सौरभ समर्थ,अनुप हरडे,बंडुजी शनिवारे, श्री डांगे,प्रणय दहीकर, अनिकेत,गौरव,पियुष, ईशान, वैभव, नवीन, हिमांशू, दर्शन,जय, अखिलेश, विवेक, सूचित, मायूली, प्रलोक,अलोक,मंदार इत्यादीसह युथ फाउंडेशनचे संपूर्ण पदाधिकारी,आपुलकी परिवारचे पदाधिकारी व जेष्ठ नागरिक मंडळचे पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात समाजबांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
जैन कलार प्रीमीयर लीग टुर्नामेंट-२०२६ थाटात संपन्न
Advertisements
Advertisements
Advertisements
विश्वभारत News Website