Breaking News

फायनलमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तान की श्रीलंका खेळणार? पाऊस आल्यास कुणाला फायदा? वाचा

Advertisements

एशिया कप 2023 मध्ये टीम इंडियाची गाडी सुसाट सुरु आहे.आणि तसं असल्याचं दिसूनही येतंय. पाकिस्ताननंतर टीम इंडियाने श्रीलंकेचा देखील दारूण पराभव केला. श्रीलंकेला नमवल्यानंतर टीम इंडियाने जवळपास फायनलचं तिकिटं गाठलं आहे. भारत आणि श्रीलंकेच्या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फेरबदल झाल्याचं दिसून येतंय. टीम इंडिया विरूद्ध फायनलमध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Advertisements

टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 41 रन्सने विजय मिळवला. एशिया कपच्या सुपर 4 स्पर्धेतील चौथा सामना जिंकून टीम इंडियाने अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित केलंय आहे. तर दुसरीकडे भारताविरूद्ध झालेल्या या पराभवानंतर श्रीलंकेसमोरच्या अडचणींमध्ये वाढ झालीये.

Advertisements

टीम इंडियाचं फायनलमधील स्थान जवळपास निश्चित
एशिया कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिलीये. टीम इंडियाने पहिल्या ग्रुप मॅचमध्ये नेपाळचा 10 विकेट्सने पराभव करत सुपर 4 मध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 228 रन्सने पराभव करून टीम इंडिया पॉइंट टेबलवर पहिल्या स्थानी झेप घेतली. तर आता श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचे दोन सामन्यांत 4 पॉईंट्स झाले असून टीमने अंतिम फेरीत प्रवेश केलाय. टीम इंडियाला अजून बांगलादेशसोबत 15 सप्टेंबरला कोलंबोमध्ये दुसरा सामना खेळायचा आहे.

श्रीलंकेच्या टीमसमोर फायनल गाठण्यासाठी मोठी अडचण
भारताविरुद्धच्या दणदणीत पराभवानंतर श्रीलंकेच्या मला आता अंतिम फेरी गाठण्यासाठी पाकिस्तान टीमला शेवटच्या सामन्यात पराभूत करावं लागणार आहे. श्रीलंकेच्या टीमने पाकिस्तानला पराभूत केल्यास त्यांना भारतासोबत अंतिम सामना खेळता येणार आहे.

दुसरीकडे श्रीलंका पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यास एशिया कपतून बाहेर पडेल. जर श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर श्रीलंका अंतिम फेरीत पोहोचणार आहे. मात्र श्रीलंकेचं रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगलं आहे.

पाकिस्तानसाठी पुढचा सामना करो या मरो
भारताविरुद्धच्या 228 रन्सच्या पराभवानंतर पाकिस्तान टीमच्या अडचणी वाढताना दिसतायत. पाकला फायनलमध्ये जायचं असेल तर श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवावा लागणार आहे. जर हा सामना पावसामुळे सामना रद्द झाला तर एशिया कपमध्ये पाकिस्तान टीमचा प्रवास इथेच संपणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना 14 सप्टेंबर रोजी कोलंबोच्या मैदानावर होणार आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

IPL मध्ये ग्लॅमरस चीअर लीडर्सची निवड कशी होते?कोणत्या सुविधा मिळतात? वाचा…!

इंडियन प्रीमियर लीग सुरू होऊन दोन आठवडे झाले. प्रतिभेला संधी मिळवून देणारी स्पर्धा असे आयपीएलचे …

‘ई-स्पोर्ट्स’ नको ; खेळातून प्रशासकीय कामकाजात होतेय सुधारणा : जिल्हाधिकारी डॉ. विपीन

“ई-चावडी, ई-फेरफार, ई-पंचनामा नागरिकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी होत आहे. मात्र, ई-स्पोर्ट्स होऊ नये. खेळ प्रत्यक्षात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *