Breaking News

कॅन्सरने घेतला दिग्गज क्रिकेटपटूचा बळी

Advertisements

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू, मनमिळाऊ स्वभावाचा हिथ स्ट्रीक यांचे बुधवारी वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झाले. काही काळापूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. ते चौथ्या स्टेजच्या कॅन्सरशी झुंज देत होते. तेव्हापासून हिथ स्ट्रीकची प्रकृती चिंताजनक बनली होती.

Advertisements

हीथ स्ट्रीकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द झिम्बाब्वेच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या हीथने नोव्हेंबर १९९३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचा पहिला सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एकदिवसीय सामना होता. यानंतर डिसेंबर १९९३ मध्ये हीथने पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने शेवटची वनडे ऑगस्ट २००५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आणि शेवटची कसोटी सप्टेंबर २००५ मध्ये भारताविरुद्ध खेळली. हीथने आपल्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकरला तीनदा आणि सौरव गांगुलीला चार वेळा बाद केले. आपल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात, हीथने भारताविरुद्धच्या हरारे कसोटीच्या पहिल्या डावात शानदार गोलंदाजी केली. त्याने निम्मा भारतीय संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला होता. हीथने त्या सामन्याच्या पहिल्या डावात ३२ षटकात ७३ धावा देत सहा विकेट घेतल्या. मात्र, त्याच्या चमकदार कामगिरीनंतरही टीम इंडियाने तो सामना १० गडी राखून जिंकला.

Advertisements

हिथ स्ट्रीकने ६५ कसोटी आणि १८९ एकदिवसीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या नावावर कसोटीत १९९० आणि एकदिवसीय सामन्यात २९४३ धावा आहेत. टेस्टमध्ये हीथने एक शतक आणि ११ अर्धशतकं झळकावली, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने १३ अर्धशतकं झळकावली. याशिवाय हीथने कसोटीत २१६ आणि एकदिवसीय सामन्यात २३९ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत ७३ धावांत सहा आणि एकदिवसीय सामन्यात ३२ धावांत पाच विकेट अशी त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. याशिवाय तो आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा प्रशिक्षकही होता.

२००५ मध्ये निवृत्तीची घोषणा केली होती. २००७ मध्ये त्याने इंडियन क्रिकेट लीग (ICL) साठी साइन अप केले आणि त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवास संपला. भ्रष्टाचारविरोधी उल्लंघन केल्याबद्दल आयसीसीने त्याच्यावर आठ वर्षांची बंदी घातली होती हा त्याच्या कारकिर्दीला मोठा फटका बसला होता. हा धक्का असूनही क्रिकेटपटू आणि कर्णधार म्हणून स्ट्रीकचा कारकीर्द मोठी आहे. त्याच्या निधनाने संपूर्ण क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

IPL मध्ये ग्लॅमरस चीअर लीडर्सची निवड कशी होते?कोणत्या सुविधा मिळतात? वाचा…!

इंडियन प्रीमियर लीग सुरू होऊन दोन आठवडे झाले. प्रतिभेला संधी मिळवून देणारी स्पर्धा असे आयपीएलचे …

‘ई-स्पोर्ट्स’ नको ; खेळातून प्रशासकीय कामकाजात होतेय सुधारणा : जिल्हाधिकारी डॉ. विपीन

“ई-चावडी, ई-फेरफार, ई-पंचनामा नागरिकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी होत आहे. मात्र, ई-स्पोर्ट्स होऊ नये. खेळ प्रत्यक्षात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *