Breaking News

रामटेकमध्ये सेनेचा पराभव होण्याची भीती? भाजपचा ‘प्लॅन’ काय आहे?

Advertisements

रामटेक लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव होतोय, अशी शक्यता महायुतीच्याच अंतर्गत सर्वेक्षणातून वर्तवली आहे. पक्षाचा पराभव झाल्यास विजयी कॉंग्रेस उमेदवाराच्या पाठीमागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावण्याची तयारी सुरू झाल्याचे समजते.

Advertisements

रामटेकमध्ये महायुतीचे राजू पारवे विरूद्ध महाविकास आघाडीचे श्याम कुमार बर्वे यांच्यात सामना झाला. वरवर हा सामना आघाडी विरुद्ध युती असला तरी तो ख-या अर्थाने कॉंग्रेस नेते सुनील केदार विरूद्ध भाजप नेते व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय वर्चस्वाचा आहे. त्याची सुरुवात ही निवडणुकीपूर्वी काही महिन्यांपूर्वी केदार यांना झालेल्या अटकेपासून झाली. केदार यांची तुरूंगातून सुटका झाल्यावर निघालेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्यांवर केलेल्या कारवाईमुळे गृहखात्याचा केदार यांच्यावरील राग स्पष्ट झाला. पुढे केदार समर्थक रश्मी बर्वे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यावर सत्ताधा- यांनी केदार यांचा राग बर्वे यांच्यावर काढला. त्यातून त्यांची उमेदवारी रद्द झाली. ऐनवेळी कॉंग्रेसला रश्मी बर्वे यांचे पती श्याम कुमार बर्वे यांना उमेदवारी द्यावी लागली. हे सर्व केदार यांना शह देण्याच्या प्रयत्नातूंन झाले. मात्र यातून रश्मी बर्वे यांच्या विषयी सहानुभूती निर्माण झाली अन् त्याचा फायदा त्यांचे पती व कॉंग्रेस उमेदवार शामकुमार बर्वे यांना झाला व ते विजयाचे प्रबळ दावेदार मानले जाऊ लागले. पोलीस यंत्रणा सरकार विरोधात कौल जात असल्याचे थेट कधीही सांगत नाही. पण संकेत दिले जातात. ते मतदानोत्तर अनुकूल नसल्याने सत्ताधारी धास्तावले आहेत. यदा कदाचित रामटेकचा कौल विरोधात गेला तर काय करायचे यासाठी जो ‘ बी ‘ प्लॅन ‘ तयार करण्यात आला. त्यामुळे कॉंग्रेस नेते धास्तावले आहेत.

Advertisements

माहितीनुसार रश्मी बर्वे यांनी नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून घेतलेल्या निर्णयांची तपासणी करून त्यात काही चुकीचे आहे का हे तपासले जात आहे. त्यांचे पती व कॉंग्रेस उमेदवार श्याम कुमार बर्वे यांच्या विरोधात निवडणूक पूर्व दाखल गुन्हे, संपत्तीची चौकशी केली जात आहे. निवडणूक निकाल जाहीर होण्यास एक महिन्यांपेक्षा अधिक कालावधी असतांना तपास यंत्रणांनी सुरू केलेल्या हालचालींमुळे कॉंग्रेस नेते सावध झाले आहे. असे असले तरी शक्तीशाली महायुतीने निकाल जाहीर होण्यापूर्वी पराभव मान्य केला का? असा प्रश्न या निमित्ताने राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

BJP मे शामिल होने को बेताब है पूर्व CM उद्धव ठाकरे? आदित्‍य ठाकरे का दो टुक बयान

BJP मे शामिल होने को बेताब है पूर्व CM उद्धव ठाकरे? आदित्‍य ठाकरे का दो …

नकली शिवसेना का कांग्रेस में विलय होना पक्का? बाल ठाकरे का नाम लेकर भावुक हुए PM मोदी

नकली शिवसेना का कांग्रेस में विलय होना पक्का? बाल ठाकरे का नाम लेकर भावुक हुए …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *