Breaking News

वकील संप करू शकत नाहीत : सर्वोच्च न्यायालय

Advertisements

वकील संप करू शकत नाहीत किंवा कामावर गैरहजर राहू शकत नाहीत,असा महत्वाचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.

Advertisements

वकिलांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी राज्य पातळीवर मुख्य न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली सर्व उच्च न्यायालयांनी तक्रार निवारण समिती स्थापन करावी असेही निर्देश दिले. तसेच जिल्हा न्यायालय पातळीवरही तक्रार निवारण समिती स्थापन करावी, असे न्या. एम आर शाह आणि न्या. अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठाने सांगितले.

Advertisements

प्रकरण काय आहे?

डेहराडूनच्या जिल्हा वकील संघटनेने त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी योग्य मंच स्थापन करण्यासाठी मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता. तो निकालात काढून न्यायालयाने निकालाची प्रत सर्व उच्च न्यायालयांना पाठवण्याचे आदेश दिले. वकिलांनी संप केल्यास किंवा ते कामावर गैरहजर राहिल्यास न्यायालयांच्या कामकाजांवर विपरीत परिणाम होतो असे आम्ही यापूर्वीही अनेक वेळा सांगितले आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष चर्चा

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष …

निर्वाचन आयोग पर हेराफेरी का संदेह : मतदान के अंतिम आंकड़े जारी करने में विलंब

इस आम चुनाव के पहले और दूसरे चरण में कम मतदान के आंकड़े आए, तो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *