Breaking News

मुंबई, नागपूर, पुण्‍यासाठी विशेष रेल्‍वेगाड्या

Advertisements

प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेता मध्‍य रेल्‍वेने विशेष रेल्‍वेगाड्यांचे नियोजन केले असून या गाड्यांच्‍या ९० फेऱ्या वाढविण्‍यात आल्‍या आहेत. यामुळे जागेच्‍या प्रतीक्षा यादीचा प्रश्‍न सुटण्‍यास मदत होणार आहे. मुंबई, नागपूर आणि पुणे या शहरांदरम्‍यान या गाड्या चालवल्‍या जाणार असून त्‍याचा फायदा पश्चिम विदर्भातील प्रवाशांना होणार आहे.

Advertisements

०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर द्विसाप्‍ताहिक एक्‍स्‍प्रेस १५ फेब्रुवारीपर्यंत चालविण्याचे नियोजन होते. आता ही येत्या ३० मे पर्यंत (३० फेऱ्या) धावणार आहे. ०२१४० नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्विसाप्‍ताहिक एक्‍स्‍प्रेसचा कालावधी १ जूनपर्यंत (३० फेऱ्या) वाढविण्‍यात आला आहे. ०२१४४ नागपूर-पुणे साप्‍ताहिक विशेष एक्‍स्‍प्रेसच्‍या ३० मे पर्यंत १५ फेऱ्या वाढविण्‍यात आल्‍या आहेत. ०२१४३ पुणे-नागपूर विशेष एक्‍स्‍प्रेसचा कालावधी ३१ मे पर्यंत (१५ फेऱ्या) वाढविण्‍यात आला आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरात अचानक विमान प्रवासी…!

नागपूर आणि विदर्भातील उद्योग, खाण आणि पर्यटन क्षेत्रात रेलचेल वाढल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील …

मकर संक्रात पर्व 14 जनवरी तक टाटानगर -बिलासपुर एक्सप्रेस ट्रेन रद्द

मकर संक्रात पर्व 14 जनवरी तक टाटानगर -बिलासपुर एक्सप्रेस ट्रेन रद्द टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *