Breaking News

रोज 100 किलोमीटर सायकल चालविल्यानंतरही ‘हार्ट अटॅक’ने झाला मृत्यू

Advertisements

फिटनेस ट्रेनर व प्रसिद्ध सायकलपटू अनिल कदसूर यांचे वयाच्या ४५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यावरून तुम्हाला लक्षात येईल की, शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणे म्हणजे हृदयाचे आरोग्य सुदृढ असणे, असे नाही. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत कितीही शिस्तप्रिय असाल तरी हृदयाची क्षमता ही इतर अनेक घटकांवर अवलंबून आहे. जेव्हा तुम्हाला तुमच्या हृदयाची क्षमता माहिती नसते तेव्हा अतिप्रमाणात शारीरिक हालचाल केल्यामुळे हृदयावर ताण पडू शकतो.

Advertisements

शारीरिकदृष्ट्या फिट असलेल्या व्यक्तीला जर मधुमेह, उच्च रक्तदाब, खराब कोलेस्ट्रॉल किंवा कोणतीही शारीरिक समस्या असेल, तर त्या व्यक्तीलाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. एथलेटिक असल्यामुळे एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या फिट असावी, असे गृहीत धरले जाते आणि आवश्यक शारीरिक चाचण्या केल्या जात नाहीत. व्यायामामुळे तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते; पण इतर समस्या असल्यास हृदयाशी संबंधित समस्या जाणवू शकतात.डॉ. प्रदीप हरणहल्ली सांगतात, “माझ्याकडे असेही रुग्ण आले आहे की, जे धूम्रपान सोडायला तयार नाहीत. कारण- त्यांना वाटते की, अथलेटिक व्यायामामुळे त्यांच्या या वाईट सवयीचा आरोग्यावर परिणाम होणार नाही. मात्र, धूम्रपानामुळे रक्त घट्ट होते आणि रक्ताच्या गुठळ्या बनतात; ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

Advertisements

कदसूर हे १०० किमी दररोज सायकल चालवायचे. पहाटे २.३० वाजता उठायचे. ३ वाजता बाहेर पडायचे. त्यानंतर सकाळी ९ वाजता ब्रेक घ्यायचे आणि पुन्हा निरोगी शरीरासाठी व्यायाम करायचे. संध्याकाळी ७ पर्यंत ते सर्व काही संपवायचे. त्यांनी लागोपाठ ४२ दिवस या सेंच्युरी राइड्स केल्या.अपूर्ण आराम आणि तीव्र व्यायाम यामुळे कालांतराने आपल्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. हृदयाच्या पेशींचे नुकसान होते; ज्यामुळे रक्तातील ट्रोपोनिन नावाच्या प्रोटीनची मात्रा वाढते आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

अनेकदा अतितीव्रतेने व्यायाम केल्यामुळे हृदयाची गती वाढते; ज्यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. खेळताना किंवा तीव्र प्रकारचा व्यायाम करताना शरीरात रक्त व ऑक्सिजनची क्षमता वाढते आणि हृदयावर ताण येतो. ही बाब सायकलपटूंमध्ये जास्त दिसून येते. मॅरॅथॉनमध्ये धावतानासुद्धा धावपटूच्या हृदयावर ताण पडतो; ज्यामुळे हृदयात तीव्र वेदना जाणवतात आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.काही वेळा तुम्हाला हायपरट्रॉफिक कार्डियोमायोपॅथी असू शकते. हायपरट्रॉफिक कार्डियोमायोपॅथी हा एक आजार आहे. या आजारामध्ये हृदयाच्या स्नायूंचा थर वाढत जातो; ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, अनियमित हृदयाची गती इत्यादी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो.

तीव्र प्रकारचा कोणताही व्यायाम करण्यापूर्वी नेहमी पूर्ण हृदयाची तपासणी करा. सायकल चालवल्यानंतर किंवा धावल्यानंतर शेवटी एमआरआय आणि रक्त तपासणी करा. जर तुम्ही नीट विश्रांती घेत असाल आणि हृदयाचे स्नायू बळकट असतील, तर हृदयाची क्षमता तुम्ही ओळखू शकता.एक स्पॅनिश व्यक्ती ६४० दिवस दररोज ४२ किमी धावली. त्याचे हृदय हा ताण सहन करू शकले. कारण- त्याने आधीच आरोग्याची तपासणी केली होती. हृदयाशी संबंधित धोका कमी करण्यासाठी आपल्याला ३० मिनिटे तीव्र प्रकारचा आणि एक तास सौम्य प्रकारचा व्यायाम करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर व्यायाम करताना छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक थकवा जाणवणे इत्यादी लक्षणे दिसत असतील, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

पौष्टिक तत्वों का खजाना है ये कलमी साग के सेवन से कब्ज, बवासीर, डायबिटीज जड से खत्म

पौष्टिक तत्वों का खजाना है ये कलमी साग के सेवन से कब्ज, बवासीर, डायबिटीज जड …

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? प्रयोग के लिए सावधानियां जरुरी

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *