मुंबई, नागपूर, पुण्‍यासाठी विशेष रेल्‍वेगाड्या

प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेता मध्‍य रेल्‍वेने विशेष रेल्‍वेगाड्यांचे नियोजन केले असून या गाड्यांच्‍या ९० फेऱ्या वाढविण्‍यात आल्‍या आहेत. यामुळे जागेच्‍या प्रतीक्षा यादीचा प्रश्‍न सुटण्‍यास मदत होणार आहे. मुंबई, नागपूर आणि पुणे या शहरांदरम्‍यान या गाड्या चालवल्‍या जाणार असून त्‍याचा फायदा पश्चिम विदर्भातील प्रवाशांना होणार आहे.

०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर द्विसाप्‍ताहिक एक्‍स्‍प्रेस १५ फेब्रुवारीपर्यंत चालविण्याचे नियोजन होते. आता ही येत्या ३० मे पर्यंत (३० फेऱ्या) धावणार आहे. ०२१४० नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्विसाप्‍ताहिक एक्‍स्‍प्रेसचा कालावधी १ जूनपर्यंत (३० फेऱ्या) वाढविण्‍यात आला आहे. ०२१४४ नागपूर-पुणे साप्‍ताहिक विशेष एक्‍स्‍प्रेसच्‍या ३० मे पर्यंत १५ फेऱ्या वाढविण्‍यात आल्‍या आहेत. ०२१४३ पुणे-नागपूर विशेष एक्‍स्‍प्रेसचा कालावधी ३१ मे पर्यंत (१५ फेऱ्या) वाढविण्‍यात आला आहे.

About विश्व भारत

Check Also

एसटी बसचा प्रवास १५ टक्क्यांनी महाग; रिक्षा-टॅक्सीच्या दरांत ३ रुपये वाढ

सर्वसामान्यांना राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बस तसेच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा झटका बसला आहे. एसटीच्या भाडेदरात शुक्रवारी …

वरिष्ठ नागरिकों के लिए रेल में लोअर बर्थ आरक्षण की सुविधा

वरिष्ठ नागरिकों के लिए रेल में लोअर बर्थ आरक्षण की सुविधा   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *