Breaking News

धर्मेंद्रने शबाना आझमीसोबत काय केलं? वाचा

Advertisements

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. रिलीजच्या काही दिवसांत थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळतेय. सिनेमात अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळतेय. फक्त आलिया रणवीर नाही ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देखील प्रेक्षकांनी मनं जिंकताना दिसत आहेत. धर्मेंद्र आणि अभिनेत्री शबाना आझमी यांची केमिस्ट्रीही सिनेमात पाहायला मिळतेय. धर्मेंद्र आणि शबाना यांचा लिपलॉक सीन पाहून प्रेक्षक हैराण झालेत. सोशल मीडियावर दोघांच्या लिपलॉकची चांगलीच चर्चा रंगली आहे. अभिनेते धर्मेंद्र हे वयाच्या 87व्या वर्षी सिनेमात काम करत आहेत यासाठी त्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. तर सिनेमात अभिनेत्री जया बच्चन देखील आहे. जया बच्चन यांनी धर्मेंद्र यांच्या पत्नीची भुमिका साकारली आहे. जया बच्चनबरोबर लग्न केल्याच्या अनेक वर्षांनंतर धर्मेंद्र शबाना यांच्यावर प्रेम करत असतात. त्यामुळे दोघे नवरा बायको असून एकाच घरात परक्या प्रमाणे राहत आहेत असं सिनेमात दाखवण्यात आलं आहे.

Advertisements

 

रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमात दुरावलेल्या धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांची लव्ह स्टोरी पुन्हा सुरू करण्यासाठी आलिया आणि रणवीर प्रयत्न करत असतात. अशातच सिनेमात धर्मेंद्र आणि शबाना यांचा एक लिपलॉक किसिंगचा सीन समोर येतो आणि थिएटरमध्ये बसलेला पब्लिक चांगलंच शॉक होतो. दोघांनी या वयात लिपलॉक सीन फार उत्तमरित्या दिला आहे. पण सोशल मीडियावर मात्र याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Advertisements

शबाना आणि धर्मेंद्र यांच्या लिपलॉक सीनविषयी ट्विटरवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यात लिपलॉक सीन असेल याची अजिबात कल्पना नव्हती, असं अनेकांनी म्हटलं आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मशहूर मॉडल की आत्महत्या केस में बुरे फंसे IPL स्टार अभिषेक शर्मा

मशहूर मॉडल की आत्महत्या केस में बुरे फंसे आईपीएल स्टार अभिषेक शर्मा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

‘महाभारत’ फेम नितीश भारद्वाज यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत IAS अधिकारी : घटस्फोटाची चर्चा

‘महाभारत’मध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज व त्यांच्या एक्स पत्नी आयएएस अधिकारी स्मिता घाटे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *