नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे स्थानकावर मिस्ट कुलिंग प्रणाली बसवण्यात आल्याने प्रवाशांना थोडासा दिलासा मिळू लागला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्याचे तापमान सोमवारी ४४ अंश सेल्सिअवर पोहचले होते. ब्रम्हपुरीमध्ये तर ४७ अंश सेल्सिअवरच्या वर तापमान पोहोचले. तर नागपुरात ४५.६ अंश सेल्सिअवर तापमान होते. शिवाय बेदरकार उन्हाळामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. या उन्हामुळे नागपुरात ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
