Breaking News

निवडणूक काळात ‘किती’ पैसे बाळगता येतात?

निवडणूक आचार संहितेतील तरतुदी सामान्य नागरिकांस माहित असतीलच, असे नाही. या तरतुदी माहित नसणारा सामान्य व्यक्ती पण प्रसंगी अडचणीत येवू शकतो, अशी ही तरतूद म्हणता येईल.

 

या निवडणूक काळात प्रवासात किंवा स्वतःजवळ ५० हजार रुपये बाळगता येतात. त्यापेक्षा अधिक रक्कम तपासणीत दिसून आल्यास तुम्हास चौकशीस सामोरे जाण्याची आपत्ती आहे. ५० हजार रुपये जर प्रवासात नाक्यावरील स्थिर तपासणी पथक किंवा भरारी पथक यांना तुमच्याजवळ आढळल्यास त्याचा हिशोब तुम्हास द्यावा लागणार आहे. म्हणजे हे पैसे कुठून आणले, कशासाठी काढले, कोणास देणार अशी प्रश्न सरबत्ती होणार. त्यासाठी जवळ पुरावा असणे आवश्यक आहे. म्हणजे बँकेतून काढले असल्यास तसा पुरावा लागणार.

 

चेक देऊन काढले असल्यास चेकची झेरॉक्स किंवा तांत्रिक पुरावा म्हणजे बँकेचा पैसे काढल्याचा एसएमएस संबंधित तपासणी अधिकाऱ्यांस दाखवावा लागेल. तो नसेल तर मग तुमच्याकडील पैसे अधिकारी ठेवून घेईल. त्याची पावती देईल. व सदर रकमेचा पुरावा दिल्यानंतर तुमचे पैसे तुम्हास परत मिळतील. पण याबाबत निवडणूक संहिता थोडी उदार पण आहे. पैसे घेऊन जाणारी व्यक्ती कोण व कशी आहे हे प्रथमदर्शनी सहज ओळखता येवू शकते. म्हणजे शेतकरी शेती खर्चाचे किंवा माल विक्रीचे पैसे घेऊन जात असेल तर त्यास नाहक त्रास देवू नये, खरं काय ते ओळखावे असे धोरण आहे.

 

पण सामान्य माणूस या तपासणीत गोंधळून जातो. त्याच्याकडे असणाऱ्या रकमेचे त्यास योग्य समर्थन करता येईलच असे नाही. अश्या वेळी अधिकारी कसं आहे यावर सगळे काही अवलंबून असते, असे एका अधिकाऱ्याने नमूद केले.समजा जवळ असलेल्या अधिकच्या पैश्याचे समर्थन पुराव्याशिवाय करता आले नाही तर ते पैसे ठेवून घेत त्या व्यक्तीस बँकेकडून पैसे काढले असे लिहून असणारा कागद आणावा लागणार. याची स्टॅंडर्ड ऑपरेशन प्रोसेस आहे. त्यानुसार कार्यवाही होणार. पण वाद होवू नये म्हणून असलेल्या रकमेचा पुरावा जवळ ठेवणे केव्हाही चांगले, असे सांगण्यात आले.

निवडणूक काळात प्रामुख्याने मोठ्या रकमेचा वापर गैर कामांसाठी होत असल्याचे म्हटल्या जाते. मतदारास आमिष म्हणून रोख रक्कम देण्याच्या घटना उजेडात आल्या आहेत. या काळात बहुतांश उमेदवार हे विविध निवडणूक कार्यासाठी रोख रकमेचाच उपयोग करतात. किंवा नगदी असेल तरच अपेक्षित व्यवहार होत असतात. म्हणून त्यास आळा घालण्यासाठी निवडणूक आचार संहितेत अशी तरतूद झाली. पण तरीही मोठ्या रकमा वाहून नेण्याचे व त्या पकडल्या गेल्याची उदाहरणे सर्वत्र दिसून आली आहे.

About विश्व भारत

Check Also

राहुल गांधींची दीक्षाभूमीला भेट : काँग्रेसचे काही नेते गायब?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज नागपुरातील दीक्षाभूमीला भेट दिली. त्यांनी येथील अभ्यागत पुस्तिकेत संदेश …

पिता की संपत्ति में बेटी को बेटे के बराबर अधिकार

पिता की संपत्ति में बेटी को बेटे के बराबर अधिकार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *