Breaking News

खोलीत 8 मुली आणि फक्त एक मुलगा : आतमध्ये…!

स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 8 मुली आणि एका मुलासह 9 जणांना अटक करण्यात आली आहे. या स्पा सेंटरमध्ये गुप्त खोल्या तयार करून अश्लिल कृत्ये केली जात होती. अनेक राज्यांतील आणि परदेशातीलही मुली यात सामील असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांच्या या कारवाईने स्पा सेंटरच्या आडून बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

 

स्पा सेंटरच्या नावाने देहव्यापार करणाऱ्या आरोपींच्या नांग्या ठेचण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात 8 मुली आणि एका मुलाला रंगेहाथ पकडलं आहे. पोलिसांच्या या छाप्यामुळे स्पा सेंटरच्या नावाने अश्लिल धंदा करणाऱ्या गुन्हेगारांची चांगलेच धाबे दणाणले आहेत. पण असं असलं तरी या घटना कमी होताना दिसत नाहीत. गेल्याच महिन्यात राजस्थानात असा प्रकार समोर आला होता. आतादेखील तसाच प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे हा प्रकार उजेडात आला आहे. स्पा सेंटरमध्ये सिक्रेट खोली बनवत तिथे नंगानाच केला जात होता. पोलिसांनी अतिशय सिनेस्टाईल स्पा सेंटरवर छापा टाकत आरोपींना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील आबूरोड कस्बे येथील दोन स्पा सेंटरवर छापा टाकला. पोलिसांनी या प्रकरणी 9 जणांना अटक केली. यामध्ये 8 तरुणी आणि एका मुलाचा समावेश आहे. अटकेतील सर्व आरोपी ही वेगवेगळ्या भागातील आहेत. अटकेतील आरोपी हे गाजियाबाद, पंजाब, जयपूर, यूपी, मुंबई, छत्तीसगड, कोलकाता अशाल वेगवेगळ्या भागातील रहिवासी आहेत.

 

 

मुली स्पेशल मसाजच्या नावाने सिक्रेट खोलीत घेऊन जायच्या

पोलिसांनी याबाबत माहिती दिली. सर्वसाधारण मसाज सुरु असतानाच मसाज करणाऱ्या मुली मुलांना स्पेशल मसाजची माहिती द्यायच्या. यानंतर मुलगा तयार झाला की त्याला दुसऱ्या गुप्त खोलीत घेऊन जायचे. तिथे अश्लिल प्रकार केला जायचा. विशेष म्हणजे सिरोही जिल्ह्यात गेल्या 2 वर्षात जवळपास 15 स्पा सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी अशाप्रकारचा नंगानाच केला जात असल्याचं उघड झालं आहे.

 

थायलंड आणि नेपाळ येथून स्पेशल पॅकेजने बोलवतात मुली

सिरोही हा राजस्थानचा सर्वात लहान जिल्हा आहे. पण तिथे अशाप्रकारचे अनेक स्पा सुरु आहेत. हे स्पा सेंटर नावाला आहेत, इथे बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय केला जातो. स्पा सेंटरचे लोक मुलींना दोन ते तीन महिन्यांच्या पॅकेजसाठी बोलावतात. या मुली वेगवेगळ्या राज्यातील असतात. विशेष म्हणजे थायलंड, नेपाळमधील मुलींनाही बोलावलं जातं. त्यांना जास्त पैशांचं पॅकेज दिलं जातं. याशिवाय कस्टमरकडूनही जास्त पैसे घेतले जातात.

About विश्व भारत

Check Also

सैकडों महिलाओं का सुहाग उजाडने वाला दाऊद इब्राहिम पाकिस्तान में!

सैकडों महिलाओं का सुहाग उजाडने वाला दाऊद इब्राहिम पाकिस्तान में! टेकचंद्र सनोडिया शास्त्रा: सह-संपादक रिपोर्ट …

जमीन जायदाद के विवाद में किसान की मौत

जमीन जायदाद के विवाद में किसान की मौत टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   छिंदवाड़ा।09.05.2025 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *