राहुल गांधींची दीक्षाभूमीला भेट : काँग्रेसचे काही नेते गायब?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज नागपुरातील दीक्षाभूमीला भेट दिली. त्यांनी येथील अभ्यागत पुस्तिकेत संदेश दिली. तो वाचून स्मारक समितीच्या सदस्यांनी आनंद व्यक्त केला. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बुधवारी नागपुरात संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ककार्यक्रम स्थळी जाण्यापूर्वी त्यांनी पवित्र दिक्षभूमीला भेट दिली. त्यांचे स्वागत डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भन्तत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी स्वागत केले. राहुल गांधी यांनी बुद्ध वंदना केली, ध्यान केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी येथील अभ्यागत पुस्तिकेत संदेश लिहला.

 

ओबीसी युवा अधिकार मंचतर्फे आयोजित संविधान संमेलनात ओबीसी, एससी, एसटी आणि महिलांसंबंधित विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या संमेलनात विदर्भातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी, सामाजिक संघटनांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठीच आहे. या कार्यक्रमात प्रामुख्याने मनुस्मृती विरुद्ध भारतीय संविधान, महिलांची आर्थिक, सामाजिक स्थिती आणि शिवशाही विरुद्ध मनुस्मृती या विषयावर चर्चा केली जाणार आहे. अनेक बुद्धिजीवी चर्चेत सहभागी होणार आहेत.

 

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात हे संमेलन होत असल्याने काँग्रेसच्या उमेदवारांनी त्याचा फायदा करून घेण्याचे नियोजन केल्याचे चित्र आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे राहुल गांधी यांचे स्वागत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर केले आहे. काँग्रेस नेते मुकुल वासनिक, रमेश चेंनिथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडघे, अनिस अहमद, बंटी शेळके सोबत होते. तर काही काँग्रेस नेते गायब असल्याची चर्चा आहे.

राहुल गांधी यांनी अभ्यागत पुस्तिकेत मला ही त्यागाची भूमी नेहमीच प्रेरणा देते, असे लिहिले.

About विश्व भारत

Check Also

भाजप आमदार समीर मेघेंची हॅटट्रिक रमेश बंग रोखणार ?

दोन वेळा हिंगणा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले भाजपचे समीर मेघे विजयाची हॅटट्रिक …

मविआ को बढ़त से रोकने के लिए सक्रिय है BJP आलाकमान

महाराष्ट्र में मविआ को बढ़त से रोकने के लिए सक्रिय है BJP आलाकमान   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *