Breaking News

१५ प्रवासी…भरधाव ट्रॅव्हल व ट्रकची समोरासमोर भीषण धडक

प्रवासी वाहतुक करणाऱ्या ट्रॅव्हल्स व हायवा ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत २ जण गंभीर जखमी तर १३ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज सोमवार २७ मार्च रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ब्रम्हपूरी नागभीड रस्त्यावरील पोदार स्कुलजवळ घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, नागपूर वरून ब्रम्हपूरीच्या दिशेने (एम.एच.४९ एटी ३०३० ) या क्रमांकाची प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हलस येत होती. या ट्रॅव्हल्स मध्ये ३० ते ३५ प्रवासी होते. ही ट्रॅव्हल्स चालक प्रचंड वेगाने चालवत होता. तेव्हा ब्रम्हपूरी-नागभीड रस्त्यावरील पोद्दार स्कुलपर्यंत ही ट्रॅव्हल्स पोहचली तेव्हा ब्रम्हपूरी कडुन नागभीडच्या दिशेने (एम.एच.४० सीटी ५६९०) या क्रमांकाचा हायवा ट्रक जात होता.

 

अचानक या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली.धडक इतकी भीषण होती की या धडकेत दोन्ही वाहनांचा समोरील भाग चेंदामेंदा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपूरी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना ब्रम्हपूरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. व गंभीर जखमींना ब्रम्हपूरीतील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.

 

यात ट्रक चालक आदीत्य विशाल ठाकरे (२४) रा.मोहाडी ता.नागभीड हे गंभीर जखमी झाले आहेत. तर ट्रक मधील क्लिनर कुणाल मडावी (३०) रा.नागभीड किरकोळ जखमी आहे.तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स मधील गुड्डु गणपत धोंगडे (३७), जितेंद्र गेडाम (३४)रा.कुनघाडा चक ता.नागभीड, मुस्कान असल्म पठाण (२५)रा.नागभीड, दिपीका विनोद मत्ते (२९) रा.वर्धा, अजमल असल्म खा पठाण (३५) रा.नागभीड, चंद्रकला वामन ढोके (७०) रा.नागपुर, एकनाथ वामन गजभिये (४०) रा.बाम्हणी तह.चिमुर, कमल भास्कर ईलकटकल ( ७४) रा.इंदीरानगर नागपूर, सचिन वामन ढोके( ३२) रा.नागपुर, पवन मधुकर उराडे ( ३१) रा.चिमुर, सुनंदा भास्कर लोखंडे वय (२९)रा.रूई ता.ब्रम्हपुरी, निशांत सुखदेव मेश्राम (३९) रा.मुल अशी जखमींची नावे आहेत.

About विश्व भारत

Check Also

आगामी कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनासाठी पालकमंत्री पद

जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांची नागपुरात माहिती नागपूर | राज्यात पालकमंत्री पदाचा वाद सुरू असताना आगामी …

भरदिवसा धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला : दोघे…!

बिबट्याचा संचार वाढला आहे. जेमतेम काही दिवसांच्या कालावधीतच बिबट्याने चौघांवर हल्ले करून गंभीर जखमी केल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *